Nojoto: Largest Storytelling Platform

New चाफा बोलेना चाफा चालेना Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about चाफा बोलेना चाफा चालेना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चाफा बोलेना चाफा चालेना.

Related Stories

    PopularLatestVideo

Shankar Kamble

Shankar Kamble

Shankar Kamble

तू गेल्यावर राहिले चाफ्याचे बहरणे
मालवून गंध जाईचा काजव्यांचे चमकणे..!

गोठले दृष्टीत अजूनी शुभ्र पुंजके तारकांचे
माळले कुंतलात तेंव्हा स्पर्श ओले मोगऱ्याचे..!

थबकलेले क्षण बिलोरी शिंपल्यात सांडले
गुंतला श्वासात मारवा रोमरोमी कोंडले..!

अवचित अधरी आल्या जुन्याच ओळी पुन्हा?
पाठलाग करतो अजूनी जशी सावली उन्हा..!

सोबतीला पायखुणा या मजसवे चालती
अर्थ सांगू मी कसा?शब्दांवीन जे बोलती..!

परतूनी येशी केधवा?आस वेडी जागते
सुकली लता केतकी बहर मातीचा मागते..!

©Shankar Kamble #roseday #तू #मी #गेली #चाफा #मोगरा #गंध #मातीचासुगंध #काजवा #गेलीस

_suruchi_

सोन चाफा तो पिवळा नाग चाफा ही बहरला अनंत ही डोकावे पहा फेर धरे गार वारा माझे अंगण शिंम्पिले पारिजात सवे दरवळे नभी टिप्पूर चांदणे

read more
..
.. सोन चाफा तो पिवळा
नाग चाफा ही बहरला
अनंत ही डोकावे पहा
फेर धरे गार वारा

माझे अंगण शिंम्पिले
पारिजात सवे दरवळे
नभी टिप्पूर चांदणे

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे मनातलं कोडं माझ्या सुटता सुटेना... #मनातलंकोडं चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai You #YourQuoteAndMine

read more
का असं होतं तेच कळेना
मनातलं कोडं माझ्या सुटता सुटेना..
प्रेम आहे की नुसतंच आकर्षण,
हेच काही समजेना.
मनातलं कोडं माझ्या सुटता सुटेना..
जवळ असता काही बोलेना,
दूर होऊन जरा ही राहवेना.
मनातलं कोडं माझ्या सुटता सुटेना.. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
मनातलं कोडं माझ्या सुटता सुटेना...
#मनातलंकोडं

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #You

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आपल्या आयुष्याचा एक म्हत्वाचा भाग म्हणजे खरं तर चष्मा पण आहे. आज एक पत्र चष्मा यावर लिहुया.. प्रियचष् #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yolewrimoमराठी #प्रियचष्मा

read more
तुझ्याशिवाय सध्या माझे काहीच चालेना
काही वाचावे म्हटलं तर ठळक अक्षर दिसेना. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आपल्या आयुष्याचा एक म्हत्वाचा भाग म्हणजे खरं तर चष्मा पण आहे.
आज एक पत्र चष्मा यावर लिहुया..
#प्रियचष्

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आज आपण अलंकारा मध्ये चेतनगुणोक्तीहा अलंकार बघणार आहोत. चेतनगुणोक्ती:- (चेतनाचे गुण सांगणारी उक्ती) चेत #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #चेतनगुणोक्तीअलंकार

read more
कवितेतील शब्द ही आता  बोलाया लागले,
मनातील गुपित सारे खोलाया लागले.
म्हणे मला
"निर्जीव शब्द मी,
येऊ लागली आता माझ्यात जान,
लिहिताना प्रत्येक शब्द  तू प्रेयसीचे ठेवतोस भान". सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आज आपण अलंकारा मध्ये चेतनगुणोक्तीहा अलंकार बघणार आहोत.
चेतनगुणोक्ती:- (चेतनाचे गुण सांगणारी उक्ती) चेत

Shilpa ek Shaayaraa

चाफ्याने चाफ्याला; जेरबंद केले
नयनात स्वप्नांना; पुन्हा कैद केले

©Shilpa ek Shaayaraa #चाफा #4Sachin #Sassy_September #शायरा_की_शायरी..✍🏻 #Pain_in_Pen #Broken_but_Beautiful  #Shilpa_ek_Shaayaraa #ShilpaSalve358 

©PhotoCredit_

Vishal Chavan

शुभ्र सतेज सुंदर, पंच पाकळी चाफा..
देह जणू स्वर्गीचा, वलयवेष्टीत चाफा...

निर्मोही तो मोठा, सुबक आकार चाफा..
सम समान सार्‍या, निर्विकार तो चाफा...

अलगद देठा पासून, पुढ्यात ठिबकतो चाफा..
तिला पुढे पाहुनी, जरा थबकतो चाफा...

वेणीत तीच्या जाऊनी, ऐटीत थाटतो चाफा..
 कर्तव्य कार्य करण्याला, सदा सज्ज वाटतो चाफा...

Vishaal/Aadinaath 
10-02-2022

©Vishal Chavan #चाफा

Shashikant Koli

चाफा #Flute

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile