Find the Latest Status about मुलीचा वाढदिवस from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मुलीचा वाढदिवस.
yogesh atmaram ambawale
डिसेंबरच्या काही आठवणी सुखद तर काही आठवणी दुःखद आहेत. कधी नव्हे ते ह्या वर्षी घडले होते 4 डिसेंबर ला मुलीचा वाढदिवस साजरा करताना हा योग आला. रात्री 11च्या सुमारास मेहुनीच्या दोन्ही मुलीचं घरी येण्याचा योग आला. आनंद साजरा करण्याचा वेग द्विगुणित झाला, कारण मेहुनीच्या एका मुलीचा वाढदिवस ही ह्याच दिवशी असतो. म्हणून दोघींनी एकत्र येऊन केक कापला. ह्या सुखद अनुभवाबरोबर एक दुःखद अनुभव ही आला, चांगला वयात आलेला मुलगा वडिलांच्या ओरडण्यामुळे रागावून आत्महत्या करून गेला. वडिलांनी चांगलेच समजावले मद्यपान वाईट असते इतकेच सांगितले होते. फरक फक्त इतकाच होता की ओरडताना मुलाचे मित्र संगती होते, म्हणून मुलाला ते शब्द खूप लागले होते. सर्वांना माझा नमस्कार🙏😊 वर्षाचा प्रत्येक महिन्यात आपल्या काहीना काही आठवणी असतातचं. आता डिसेंबर संपत आलाय वर्ष सपतयं. मग या डिसेंबर च्या काह
Mohan Somalkar
प्रसन्नीत मुद्रा॥ सदा मुखी हास्य॥ काय करु भाष्य ॥ ताईवरी॥१॥ पहाट पूर्वेला ॥ सूर्योदय झाला॥ दिवस हो आला॥ सौख्याचा हा॥२॥ थबके रांगोळी॥ आठवल्या ओळी॥ लाऊ लाडीगोळी ॥ ताईपाशी॥ मंगल दिवस ॥ सुखाचा पाऊस॥ तो वाढदिवस ॥ आज आला ॥४॥ आरतीचे ताट॥ पाहु नका वाट॥ औक्षवाण लाट॥ येऊद्या ग॥५॥ ज्ञाना निशा मनी॥ अनघा अश्विनी॥ सुप्रिया ती रानी॥ सार्याजणी॥६॥ औक्षवाण करा॥ पेढा बर्फी चारा॥ सुखाचाच वारा॥ ताईघाला॥७॥ आली धावत ती ॥ रश्मीजी ही आली॥ भेट ती पहिली ॥ आज झाली॥८॥ सचिन कुमार॥ साहित्याचा हार॥ केकाचीच कार ॥ आणली रे॥९॥ निवडक परिवार व काव्यपुष्प समुह तर्फे ताईला शब्दरुपी वाढदिवसाच्या शुभेच्छा मोहन दादा सोमलकर व सौ.भारतीमोहन ©Mohan Somalkar #वाढदिवस
गोरक्ष अशोक उंबरकर
खूप छान वाटतं तुझं माझ्या सोबत असणं.. दिवस छान जातो तुझं बघून सुंदर हसणं... कधी विचार नाही केला तुझ आयुष्यातच नसणं.. तुझं असणं म्हंजे जणू स्वर्ग पृथ्वीवरती भासणं.. खरंच खूप छान वाटतं हातात हात घेऊन चालणं.. तू दीर्घायुषी होवो देवाकडे हेच एक मागणं .. तू दीर्घायुषी होवो देवाकडे हेच एक मागणं .. ©गोरक्ष अशोक उंबरकर वाढदिवस
Mohan Somalkar
आला तो दिवस परत हर्षाचा त्या जुन्या आठवणी घेऊन नव वर्षांचा ! परत नव्या उमेदीचे ते क्षण मनी साठवले ईश्वराने सुखाचे ते रेशीमबंध मनी साचविले.! लग्नाचा हा वाढदिवस परत तो सोनरी दिवस डोळ्यात नव चैतन्यमय होतो नवी शितलता घेऊन तो सजतो.! लग्न वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा ताई व जावयास मोहन सोमलकर ©Mohan Somalkar # वाढदिवस
Shivram Masurkar
निखळ हास्याची कळी सदा पडो तुझ्या गाली सुखाच्या श्रावण सरी रोज पडो तुझ्या दारी दृष्ट न लागो तुला कुणाची हीच आशा आमच्या मनाची क्षण हा तुझ्या वाढदिवसाचा शुभम भवतू आशिष आमचा तुझेच लाडके ताई आणि भावोजी #वाढदिवस
Mohan Somalkar
मित्रवर्य दिलीप चौधरीचा वाढदिवस दि लाचा राजा दिलीप मैत्रीत ताचा गाजावाजा ली खाणातुन त्याला शुभेच्छा देतो. प रमेश्वर त्याला सुदृढ आयुष्य देवो. चौ पाटी वर बसुन मित्रांशी संवाद साधतो ध रोवर मनात स्नेहाची जपतो. री मझिम जीवनरुपी पावसात तो मनसोक्त गातो मित्रवर्य दिलीप हा आयुष्यात नेहमीच आनंदी असतो जीवनात आनंदी कसे रहावे. हे त्याच्यापासून शिकावे. वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा मोहन सोमलकर नागपुर ©Mohan Somalkar #वाढदिवस
Mohan Somalkar
आज सौ. प्रियामॅम घोडके यांचा वाढदिवस ओळख साहित्यातुन झाली शब्दांनाच फुटली पालवी स्नेह व आपुलकी ती वाटत फिरली बोलणं तिचे लाघवी.! अष्टपैलुत्व तिला साहित्यातुन लाभले किती काव्यप्रकार तिने आम्हास शिकविले लहानमुलांसारखे समजवुन सांगितले धडे साहित्याचे तिने दिले..! स्पर्श लेखणीचा सदा उपक्रमांद्वारे साहित्यातुन दिला जिव्हाळा शब्दलेखणीतुनी सदैव दिसला..! दोन वर्ष पाहता पाहता निघाले बोलणे लडीवाळ, आदर मोठ्यांचा ह्दय कसे रेशमी धाग्याने जुडले आज वाढदिवशी पाऊस पडावा शुभेच्छांचा ! प्रियाताई ला वाढदिवसानिमित्त लेखणीतुन शुभेच्छा🍧🍫🍨 मोहन सोमलकर ©Mohan Somalkar #वाढदिवस
Mohan Somalkar
श्री. राजु धानुजी वलथरे वृक्षवल्ली वनचरे असा ठेवा जपणारा मैत्रीच्या मैफलीत वावरणारा मैत्रीचा तो आहे दुवा .! तो मित्र जाणवावा.! तो एक वकिल आहे न्यायाची बाजु मांडतो तो एक वन अधिकारी आहे वनाला जपतो जखम वन्यप्राण्यास झाली तो विवळतो झाडाचा प्राण त्याच्यात आहे तो वृक्षारोपण व जीवनदानाचा दरवर्षी कार्यक्रम राबवितो दादासाहेब पिता त्याचे त्यांच्या पावलावर पावले ठेऊन चालतो गरिबांना व गरजुना मदतीचा हात पुढे करतो.! आज वाढदिवसानिमित्त राजुभाला खुप खुप शुभेच्छा ©Mohan Somalkar #वाढदिवस
Mohan Somalkar
पिहुचा वाढदिवस लेकीचा वाढदिवस! आजच्या दिवशी आली लक्ष्मीची पाऊले घरी! जन्मोत्सव झाला होता घरात आनंद बहरला त्या प्रहरी! पोटी मुलगी जन्माला येणे भाग्याची गोष्ट समजतो! कौतुक तिचे जन्मभर करुनी लग्न तिचे करुनी परगृही धाडतो! काळीज आपले ओवाळून मुलीला जीव सारे लावतात.! काटा जरी तिच्या पायात रुतला वेदना मायबापाला होतात.! खुप मोठी व्हावी तू शिक्षणाने व संस्काराने झेप घ्यावी! यशाचे शिखर गाठून कुटूंबाची किर्ती मोठी करावी.! मोहन सोमलक ©Mohan Somalkar #वाढदिवस