Find the Latest Status about दाटले हे धुके from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दाटले हे धुके.
Rajendrakumar Shelke
काव्यलेखन *विषय:-दाटले हे धुके प्रीतीचे* ******************** दाटले हे धुके प्रीतीचे मन बावरे झाले, चित्त नाही हे थाऱ्यावर प्रेमाने चिंब ओले. अंतरंगी पटलावर खेळ प्रेमाचा चाले, क्षणोक्षणी तुला पाहता मन अस्थिर झाले. काय जादू तुझ्या प्रेमाची मजवरी तू केली, उठता बसता वाटते तू समोरच आली. प्रेमाच्या दवात भिजलो आधार घेत तुझा, दाट धुक्यात हरवुनी कधी न होई माझा. ------------------ *✍️ राजेंद्रकुमार शेळके.* -- नारायणगाव, पुणे. ©Rajendrakumar Shelke दाटले धुके हे प्रितीचे
दाटले धुके हे प्रितीचे #मराठीप्रेम
read moreDevanand Jadhav
दाट धुके पसरले आवारा शिवारात तरू वेली बंदिस्त धरतीच्या देव्हाऱ्यात ✍🏻© •देवानंद जाधव• धामणी. jdevad@gmail.com 9892800137 ©Devanand Jadhav धुके...
धुके... #मराठीकविता
read morepriyanka
पहाटेचे हे धुके जसे जसे तुम्ही पुढे जाल आपोआप नाहीसे होत जाईल आलेली संकटे किंवा आव्हाने सुद्धा अशी च असतात त्यांना न घाबराता सामोरे गेले पाहिजे तरचं जीवन जगता येईल. स्पंदन-प्रियंका धुके...
धुके... #Quote
read morevishnu thore
काळजाच्या काळजीची सारी गोठलेली माया संशयाचे धुके दाट जीव जीवाला पराया धुके....
धुके....
read moreMahesh Lokhande
#OpenPoetry धुके शुभ्र धुके ते दिसे सभोवती अंधुक दिसती झाडे अंधुक रस्ते अंधूक गाड्या अंधूक दिसती वाडे दूरदूरचे दिसे न काही गाड्याही धावती संथगती लाईटी लावूनी झाली तरी चालकांची ती कुंठीत मती कान बांधूनी स्वेटर घालुनी हात खिशात बंद केले चौकाचौकात करूनी शेकोट्या शेकत हो कुणी बसले हात गारठले कान गारठले थडथडती दात सर्वाच्या मुखातून पाहिली वाफ ती जात चहा काॅफीचे कप रिचवले आज पहाटेला हिवाळ्याने धुक्याचा हा चमत्कार केला अंग हालती शब्द न बोलती अशी धुक्याची करणी हिवजादूगारे रूप घेतले आज जणू अवनी हरितवनांवर दवबिंदूंचा पडू लागला सडा शुभ्रनभातून शुभ्रधुक्याचा पाऊस आला बडा सगळे फिरती रस्त्यावरती तरी न कुणी भिजती हातकान ते सुंभ होऊनी नाकास येते भरती सूर्य उगवता पूर्वेला प्रकाश तेजस्वी आला जादूगारे पाहूनी धुक्याचा खेळच संपवला धुके
धुके #poem #OpenPoetry
read moreVishvajeet Kshirsagar
मनात दाटले,डोळ्यात सजले, अश्रू अनावर होऊनि चेहऱ्यावर ओघळले... आठवणींची झालर घेऊनी भूतकाळाचे साज सजले.. अन मनात दाटुनी शब्द पुन्हा लेखणीतून अवतरले..!! #मनात दाटले...
somnath gawade
मनात विचारांचे दाटलेले हे धुके.. या धुक्यातून वाट काढावी. आणि शब्द व्हावेत मुके अशातच समोर मात्र तु दिसावी. धुके
धुके
read moreVishvajeet Kshirsagar
मनात दाटले,डोळ्यात सजले, अश्रू अनावर होऊनि चेहऱ्यावर ओघळले... आठवणींची झालर घेऊनी भूतकाळाचे साज सजले.. अन मनात दाटुनी शब्द पुन्हा लेखणीतून अवतरले..!! #मनात दाटले..