Nojoto: Largest Storytelling Platform

Best बाईच्या_जातीने Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best बाईच्या_जातीने Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 3 Stories

Shankar Kamble

*पंख छाटले माझे जरीही*
*उमेद काही हरली नाही*
*नकोत कुबड्या सहानुभूतीच्या*
*खंबीर उभी कोसळले नाही...*

*भार पेलले किती सोसले*
*उर फुटला परी ना कण्हले*
*श्वास भरुनी जगू दे आता*
*कोठडीत त्या मजसी कोंडले..*.

*विस्तीर्ण मोकळे निळे जांभळे*
*खुणावते आकाश वेगळे*
*पायवाट ती नकोच उसनी*
*मार्ग स्वतःचा मला आकळे...*

*घाव घालून मीच तोडले*
*पाश बेगडी सर्व सोडले*
*स्वाभिमान ना गहाण आता*
*लाचारीचे वस्त्र फेडले...*

*आक्रोशाचे गीत युगांचे*
*कधी तुझ्या कधी माझ्या ओठी*
*गाणारे जरी कंठ बदलले*
*मूळ वेदना एकची पोटी...*

©Shankar Kamble #स्त्री #स्त्रीत्व #स्त्रीजीवन #बाई #बाईच्या_जातीने #घुसमट #बाईपणाच्या 

#betrayal

Shankar Kamble

*कल्लोळ वेदनांचा* 
 *हुंकार दाटलेला* 
 *उंबऱ्याआड आजही* 
 *टाहो पेटलेला* 

 *जळते किती निखारे* 
 *पदरात बांधलेले* 
 *आभास मुक्ततेचा* 
 *श्रृंखलेत वेढलेले* 

 *घायाळ तनां-मनांला* 
 *लिंपण उरे ना काही* 
 *चूक एवढी विधात्या* 
 *जन्मा घातलीस बाई* 

 *बंदिनी असे युगांची* 
 *भोग बाईपण सरेना* 
 *तुझ्या पुढारलेल्या विचारांचा* 
 *खोटा बुरखाही पुरेना* 

 *लटकल्या पेटवल्या* 
 *खोट्या प्रतिष्ठे नाडल्या* 
 *देह लचके तोडूनी* 
 *किती मातीत गाडल्या* 

 *श्वास उसने अस्तित्वाचे* 
 *उपरे जीणे बांडगुळाचे* 
 *माझी मीच मला पारखी* 
 *बंड शमले चेतनेचे*

©Shankar Kamble #स्त्री #बाई #स्त्रीजीवन #बाईच्या_जातीने #दुःख #जगणे_येथे_महाग_झाले

sandy

#बाईच्या_जातीने साधारण १९८५ च्या दशकापर्यंत ज्या ज्या मुलींचा जन्म झाला त्यांनी "बाईच्या जातीने" हा महा फेमस डायलॉग कित्येकदा ऐकला असेल ह्यात शंकाच नाही , मग हळूहळू जशा जशा ह्या दशकातल्या मुली मोठ्या होऊन त्यांच्या मुलींच्या आया झाल्या तशा ह्या डायलॉग ला गंज चढला असावा आणि आता तर हा डायलॉग बहुतेक लोपच पावलेला दिसतोय ! तरी मागच्याच आठवड्यात माझ्या एका मैत्रिणीच्या घरी असाच एक किस्सा घडला अर्थात मी तिथेच होते आणि ह्यावर लिहिण्याची कल्पना मला तिथेच सुचली ! तर तसे बघाल तर आज "मजेचा" पण त्यावेळी

read more
 #बाईच्या_जातीने

साधारण १९८५ च्या दशकापर्यंत ज्या ज्या मुलींचा जन्म झाला त्यांनी "बाईच्या जातीने" हा महा फेमस डायलॉग कित्येकदा ऐकला असेल ह्यात शंकाच नाही , मग हळूहळू जशा जशा ह्या दशकातल्या मुली मोठ्या होऊन त्यांच्या मुलींच्या आया झाल्या तशा ह्या डायलॉग ला गंज चढला असावा आणि आता तर हा डायलॉग बहुतेक लोपच पावलेला दिसतोय ! 

तरी मागच्याच आठवड्यात माझ्या एका मैत्रिणीच्या घरी असाच एक किस्सा घडला अर्थात मी तिथेच होते आणि ह्यावर लिहिण्याची कल्पना मला तिथेच सुचली ! 

तर तसे बघाल तर आज "मजेचा" पण त्यावेळी

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile