Find the Best जगणे_येथे_महाग_झाले Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Shankar Kamble
जड झाले पाय जरी वाट तरी चालतो आपण खांदेपालट करून जराशी ओझे ‘तेच‘ वाहतो आपण... मी नाही बरे त्यातला ’बरे’ तेच सांगतो आपण कोण बरोबर? कोण चुकीचा? खरे कधी वागतो आपण? अपराधी तर इथेच सारे गुन्हा कोणता करतो आपण? मूकपणाने अन्यायाचे गर्भ पोसतो उदरी आपण... नव उड्डाणे आव्हानांची रोज नवी आखतो आपण जगण्यामधल्या आनंदाचा गंध कधी भोगतो आपण? कवेत घेण्या आकाशाला पंख पसरतो सारे आपण कर्तव्याचा भारच इतका जमिनीपुरते उरतो आपण... प्राक्तनाचे भोग अकल्पित अवधाने रांधतो आपण भोगाची जोडून वल्कले काय उसने सांधतो आपण? रंगमंच हा जीवनाचा किती नाटके करतो आपण पडदा पडता एकदाचा अंक नवा जोडतो आपण... ©Shankar Kamble #Flower #गझल #शब्दरंग #शब्द #गजल #शब्दांचेअवजार #जगणे_येथे_महाग_झाले #जग
#Flower #गझल #शब्दरंग #शब्द #गजल #शब्दांचेअवजार #जगणे_येथे_महाग_झाले #जग
read moreShankar Kamble
*भावार्थ काय शोधू आयुष्य वेचताना भाग्य इतुके लाभले मज भाव कोवळे जपताना* ... *लवलेश ना लयाचा आरंभ अंत पार* *हसऱ्यां फुलांसवे मी नितं स्वच्छंदी रमताना* ... *उकलली मनाच्या खोल तळाशी* *खूणगाठ बांधलेली* *शहाण्यांच्या जगात वेडा मी एक हासताना* ... *सांज होता उडून गेले पंख पसरूनी* *क्षण निसटले* *कशास गुंता उगा सोडवू शांत स्तब्ध मी खग बघताना* ... *जीवनरस हा नितं प्रवाहित खंड त्याला कदा नसे* *सुखदुःखाचे गरळ पचवूनी प्रवाही स्वैर तो वाहताना...* ©Shankar Kamble #आयुष्य #जीवन #जीवनअनुभव #जगणे_येथे_महाग_झाले #जीवनगाणे #जीव #आयुष्य_जगताना #Drown
Shankar Kamble
*कल्लोळ वेदनांचा* *हुंकार दाटलेला* *उंबऱ्याआड आजही* *टाहो पेटलेला* *जळते किती निखारे* *पदरात बांधलेले* *आभास मुक्ततेचा* *श्रृंखलेत वेढलेले* *घायाळ तनां-मनांला* *लिंपण उरे ना काही* *चूक एवढी विधात्या* *जन्मा घातलीस बाई* *बंदिनी असे युगांची* *भोग बाईपण सरेना* *तुझ्या पुढारलेल्या विचारांचा* *खोटा बुरखाही पुरेना* *लटकल्या पेटवल्या* *खोट्या प्रतिष्ठे नाडल्या* *देह लचके तोडूनी* *किती मातीत गाडल्या* *श्वास उसने अस्तित्वाचे* *उपरे जीणे बांडगुळाचे* *माझी मीच मला पारखी* *बंड शमले चेतनेचे* ©Shankar Kamble #स्त्री #बाई #स्त्रीजीवन #बाईच्या_जातीने #दुःख #जगणे_येथे_महाग_झाले
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited