Nojoto: Largest Storytelling Platform

Best जगणं Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best जगणं Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about जगणं कळतं तेव्हा pdf, जगणं कळतं तेव्हा, जगणं वागणं, जगणं म्हणजे काय, जगणं मराठी कविता,

  • 16 Followers
  • 20 Stories
    PopularLatestVideo

Shankar Kamble

मीच माझ्या वांझ मनाशी एक करार केला आहे
श्वासापुरते जगणे केवळ लयास माणूस गेला आहे...

नकोच उसन्या सुखदुःखाची रंगीत झालर चमचमणारी
श्रावण सरता वैशाखाची दाह,होरपळ धूसमुसणारी...

रोज पाहतो त्याच राऊळी तीच प्रभावळ तो वनमाळी
लोभ, वासना दंभपणाची भणंग घेऊन फिरतो झोळी...

कांगोऱ्यांनी सजले –नटले खुले अंगण निळ्या नभाचे
बिंब उमटता रक्त वर्णी ते कोश लोपले गर्द ढगाचे...

उगाच वाटे डोळ्यामधला पाझर आता आटून गेला
किती पेरले कोंब तरीही तळ मनाचा सुकून गेला...

एकच जीवन एकच जगणे एक धून पण कैक तराने
रंगमंच हा युगा युगांचा पडदा पडता येणे– जाणे...

©Shankar Kamble #माणूस #माणूसम्हणूनजगताना #जीवन #लढा #जगणं #अस्तित्व #प्रेम #चिंतन

aaj_ki_peshkash

#TereHaathMein #जन्म आणि #मरणं यामध्ये जे #जगणं असतं ना तेच राहून गेलय तुझ माझ्यापाशी... माझं तुझ्यापाशी... आता #मोकळे करावेत #बंध आणि घट्ट व्हावे बाहुपार तुझे माझ्याभोवती... माझे तुझ्याभोवती... #मराठीप्रेम #प्रेम

read more
mute video

Shankar Kamble

वेदनेचा बाजार मांडला दुःख विकण्या सांगतो मी
भार दाटला पुन्हा ढगाला डोळ्यांत पाऊस मागतो मी

पेटलेल्या उन्हांत आता झाड सोसते तप्त झळाला
आठवून मग उंबऱ्याला जीव उगां का जाळतो मी?

मतलबी दुनियेत होते पायपुसणी भाबड्याची
कातडी जपतो स्वतःची पारखून जग वागतो मी

टांगली कित्येक स्वप्ने का नव्याने न्याहाळतो?
देवून चकवा पांगलेल्या पाखरांना भांडतो मी

माखलेल्या गर्द हळदीचा गंध  ना लाभला
रंगल्या मेहंदीतल्या हातांस दूर पाहतो मी

सळते जीवांला जाळतेही पुन्हा पुन्हा ती सांगते ही
भंगलेल्या राऊळाच्या पायरीला थांबते मी 

उघड्यावरचा असा पसारा आज वाटतो आवरावा
गाठोड्याचा भार शिरावर मूकपणाने चालतो मी

©Shankar Kamble #Past #गझल #वेदना #दुःख #जीवन #जगणे #जगणं #सांजवेळ

Deepali Ghoge

नमस्कार मित्रहो आताचा विषय आहे जगणं... आयुष्याच्या जत्रेत कधी जगायचं राहुन जातं, जगत असतो सार काही पण तरिही जगायचं राहुन जातं... #जगणं #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
जगण्यासाठी काय लागतं 
एकतर श्र्वास ...... दुसरं
ते चालु ठेवण्यासाठी 
...... लागणारा ध्यास नमस्कार मित्रहो
आताचा विषय आहे
जगणं...
आयुष्याच्या जत्रेत कधी जगायचं राहुन जातं,
जगत असतो सार काही पण तरिही जगायचं राहुन जातं...
#जगणं 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

Prabhavati Thosar

mute video

Shankar Kamble

चिरा–चिरा घडवून श्रमाने
मानवतेचे बांधू मंदिर
क्षणभंगुर श्वासाचे देणे
प्रेमे नांदो आपण सहोदर..

हेवा जावो धुवून मनाचा
निर्मळ व्हावे आता अंतर
द्वेश,किल्मिषे जाळून टाकू
करू मोकळे भरले अंबर..

भार उचलू मिळून सारे
एकजुटीची मूठ आवळू
निढळावरचा घाम सांडता
गंध मातीचा फुले परिमळु..

बंद कवाडे करून मोकळे
साद ऐकू रे अंतरीची
ताल देवूनी हृदय सांगते
गती एक ती एकपणाची..

नवे पंख अन् नवी आव्हाने
रोज खुणावे क्षितिज मोकळे
कवेत घेण्या आकाशाला
तोड बंधने जुने, खुळे..

©Shankar Kamble #Light #मानवता #माणूस #जीवन #जगणं #जीवनअनुभव #उड्डाण#भरारी

Shankar Kamble

*कलियुगी पातकांचा* 
                  *भार दाटला भूवरी* 
       *आता धाव पांडुरंगा* 
                  *सोड भीमेची पायरी...* 

        *अग्निदिव्य रोज इथे* 
                 *सत्य,नीतीचे अघोरी* 
         *माथा उजळ फिरती* 
                *कूट, अनिती, लाचारी...* 

         *जो –तो आपली भाकरी* 
                *भाजण्यात आहे दंग* 
         *परउपकारा कोणी* 
               *गात नाही रे अभंग...* 

         *माय ,मातीचा लिलाव* 
               *किती दलाल पोसले* 
         *कुठं विकलं इमान?* 
                *तेज दानाचे लोपले...* 

      *आंधळ्या नि बहिऱ्यांची* 
               *वस्ती इथे दाटलेली* 
       *रंगा ,झेंड्यामध्ये तुझी* 
                *लेकरं रे वाटलेली...* 

        *बरबटलेले हात* 
              *मुख झाले ते मलीन* 
        *उतराई पुण्यायाची* 
              *कर पाप्यांचे क्षालन...*

©Shankar Kamble #Starss #कलियुग #पाप #पुण्य #जग #पांडूरंग #जगणं

Shankar kamble

mute video

Shankar kamble

गर्दीत माणसांच्या....
गर्दीत माणसांच्या चुकलो कधीच नाही
चाललो एकटा पण थकलो कधीच नाही

देवूनिया दिलासे समजावतो मनाला
खोटे कुणा खुलासे केले कधीच नाही

हातात भाग्यरेषा शोधतो पुन्हा नव्याने
भाग्यातले कुणाचे नेले कधीच नाही

फाटक्याच झोळीतले मोती उधळले सुखाचे
भणंग असलो जरी मी चोरले कधीच नाही

माझ्याच सावलीला पोरका असा अभागी
ओरबाडूनी सुखाला छळले कधीच नाही

बसूनी उगा किनारी लाटांची चिंता कशाला
ढाल करुनी कधी कुणाची लढलो कधीच नाही

क्षितीजावरी बहरल्या रंगछटा मावळतीच्या
अत्तरापरी सुगंधी जगणे करून गेलो

©Shankar kamble #गर्दी 
#माणसे 
#वाट 
#सुख 
#जीवन 
#आयुष्य 
#जगणंकसंअसावं 
#जगणं

Harsh

#जगणं Message-stay safe from corona virus

read more
जगणं 

बऱ्याच वर्षात आज वाटली थोडी भीती 
             विचारलं मी मनाला कुठे हरवलो मी? 
समोर दिसू लागलं माणसाचं जगणं, 
           दिसू लागलं आजच्या माणसाचं वागणं. 

स्वार्थ आणि अर्थ (पैसा ) होत आहेत मित्र, 
            जगणं हिसकावून घेत आहे काळोख्याची रात्र. 
आळसाने संपून टाकलाय आमच्यामधील संघर्ष, 
          व्हायचे ते आजच होऊ दे, कशाला  उगाच वर्ष.

आयुष्याच्या प्रवाहात वाहत -वाहत गेलो, 
           कळलं नाही आम्हाला कधी समुद्रात आलो. 
वाटलं मग सगळं पाणी, माझंच आहे हे, 
             जिभेने सांगितलं वेड्या, खारट आहे ते. 

जगणं काय असतं विसरलो आहोत आम्ही, 
             आपल्याच माणसाला म्हणतो काय केलं तुम्ही? 
वाटत मग एका क्षणी का होते हार? 
                    आठवतो जोडीचा मित्र तो अहंकार. 

हसत- खेळत माणूस जीवनात मोठा होतो, 
              स्वतःसाठी जगतांना कधी दुसऱ्यासाठी जगतो. 
ज्ञानी माणूस स्वतःहून जग निरखून पाहतो, 
                अज्ञानी माणूस पुढे व्यर्थ होऊन जातो. 

म्हणूनच 
 जगतांना प्रत्येक क्षणी आनंदाने जगा, 
           ईश्वराने जीवन दिलंय पुर्ण विश्व बघा.
सांगता येत नाही उद्या काय होईल, 
               जगण्यासाठी जीव राहील की जाईल? 

मारतावेळी म्हणाल मग, 
या जन्मी मनासारखं जगताच आलं नाही, 
  पुन्हा जन्म होऊ दे, तुझ्याच पोटी आई,तुझ्याच पोटी आई.

                                                      हर्षल दत्तात्रय चौधरी #जगणं
Message-stay safe from corona virus
loader
Home
Explore
Events
Notification
Profile