Nojoto: Largest Storytelling Platform

Best वास्तव Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best वास्तव Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutवास्तव meaning in hindi, वास्तव में, वास्तव meaning in english, वास्तव इन हिंदी, वास्तव संख्या म्हणजे काय,

  • 22 Followers
  • 77 Stories

Dileep Bhope

वास्तव. 

शेत   पिकंना, 
पिकलंत विकंना,
दमडीमोल भाव..
बांधावरच्या राजाला 
सपानच दिसाया लागलय.
साप साप म्हणावा यांनी 
आणि धोपटावी भुई
बिळातून सापही बघ 
कसं हसाया लागलय...

#दिबाभोपे

©Dileep Bhope #वास्तव

Mukesh Poonia

#akela #एहसास करें कि आप #वास्तव में क्या चाहते हैं। इससे आप #तितलियों का पीछा करने से बचेंगे और #सोना खोदने में जुट जाएंगे। #विलियम #मोल्टन #मार्सडेन

read more

Dileep Bhope

Ranjit Kumar

#वास्तव में #प्रेम क्या है?

read more

Shankar kamble

*टीचभर पोटासाठी* 
 *चालं धावा धाव सारी* 
 *घडीभर ना इसवा* 
 *फरफट पाठमोरी* 

 *किती करावा सायास?* 
 *किती जोडावी ठिगळं?* 
 *जरी वाटतं सांधलं* 
 *परी फाटकं आभाळ* 

 *पीठा-मीठाचाचं घोर* 
 *रोजं तजवीज नवी* 
 *शेणा-मातीत राबती* 
 *पसां भाकरी त्या हवी* 

 *लुगडं फाटकं मायेचं* 
 *बा ची उसवली बंडी* 
 *झोपडीत मुक्कामाला* 
 *ऊन, पाऊस नी थंडी* 

 *कुठं लपलास देवा?* 
 *का रं गेलास तिष्ठूण?* 
 *दिन-दुबळ्यांच्या माथी* 
 *कोरी होरपळीचं गोंदण* 

 *कोंडमारा हा जलमाचा* 
 *घालमेल अंतरीची* 
 *कधी येईल अंगणी* 
 *सुखी सर चांदण्याची*

©Shankar kamble #जीवन #जगणंकसंअसावं #वास्तव #

#humantouch

Rajeshwari Ghume

पोटाच्या आगीसाठी 
ती सरपण होऊनी जळते
ती चिंतेने थबथबलेली
पण तो नशेत भिजलेला...
झेलीत विखारी नजरा 
ती काम करते आहे
रोज थोडे मरूनी 
ती भविष्य वेचीत आहे
तरी तो नशेत भिजलेला...
- वीणा #वीणा #ती #वास्तव

शब्दांची गुंफण@प्राजक्ता वाघमारे -सोनावणे

शब्दांची गुंफण@प्राजक्ता वाघमारे -सोनावणे

शब्दांची गुंफण@प्राजक्ता वाघमारे -सोनावणे

अंधश्रद्धा...

देवाच्या नावावरती 
किती लोकांना लुबाडती

सारं काही जातं
तरी लोकही काही नाही शिकती

श्रद्धेचा घेतला जाई आधार
पागडे मात्र अंधश्रद्धेचे जड करती

मोक्षाच्या स्वार्थात
असलेलं सुखही हरवती

लालच वाढत जात
नात्यांनाही लोक मुकती

दिवसाही अंधार दाटतो
अंधश्रद्धेपायी कित्येक घरे तुटती

देवाच्या नावावरतीच तर
भोंदू लोक अंधश्रद्धेला मोठे करती... #वास्तव#अंधश्रद्धा

शब्दांची गुंफण@प्राजक्ता वाघमारे -सोनावणे

loader
Home
Explore
Events
Notification
Profile