Nojoto: Largest Storytelling Platform

Best गझलेची Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best गझलेची Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutगझलेची जमीन, गझलेची बाराखडी,

  • 1 Followers
  • 3 Stories

Shankar Kamble

*न केलेल्या गुन्ह्याची रोज शिक्षा भोगतो मी* 
 *देवून श्वास उसने मरणांस रोखतो मी* 

*सांगून गूज कानी अंधार पेटलेला*
*चेतवू नको स्मशाने राखेत शोधतो मी*

*डोळ्यांत दाटलेल्या सरी कैक शांत गहिऱ्या*
*बरसू नको अवेळी वळीवास सांगतो मी*

*संवाद साधण्याला प्रतिसाद सादास द्यावा*
*भाषा अबोल आहे मौनास जाणतो मी*

*मातीत पेरलेल्या अंकुरास धाप लागे*
*तोडून नाळ ओली प्राणास शिंपतो मी*

*पानांस गर्द हिरवा माखून साज रंग*
*भाळी उदास रेषा कुंकास रेखतो मी*

*लपेटून नशिबाच्या लक्तरात आयुष्याला*
*दोष कोणता ?कुणाचा? कोड्यात गुंततो मी*

*जपले उरांत त्यांनी कवटाळूनी घराला*
*केल्या उभ्याच भिंती दगडांस भांडतो मी*

©Shankar Kamble #Travel #गझल #गझलेची #जीवन #माणूस #जीवन #अनुभव #धोका

Shankar Kamble

....गझल....
सुकलेल्या पात्यास सांगा पावसाळे सरून गेले
कशास झुरणे आता अवेळी बेट ढगांचे दुरून गेले

सप्तरंगी इंद्रधनुला नजर लागली कशी कुणाची
गंध उडावा जसा अत्तरी रंग जीवनी विरून गेले

उमटलेल्या पायखुणांचा मागमूस ना आता उरावा
रिती करावी ओंजळ वाटे डोह मनाचे भरून गेले

चोरपावली सांज दाटते गडद गहिरी तरुतळी
भावनांचे रम्य पिसारे अलवार एकदा फिरून गेले

पुसू कुणाला प्रश्न किती ते उत्तरावीन जरी तिष्ठले
गूज मनींचे मनांस ठाऊक नजरेने ते कळून गेले

आणाभाका मधु प्रीतीच्या वचनांची ती पुन्हा उजळणी
शिंपले आता अमृत जरीही कोंब कोवळे मरून गेले

©Shankar Kamble #प्रेमकवि #विरह #गझल #मराठीशायरी #कवी #प्रेम #गझलेची 

#diary

Shankar Kamble

विरहात चांदण्यांच्या गोंदणात दिसतेस तू
नाही म्हणू कशास दर्पणी त्या हसतेस तू

नांदलीस झोपडीत या हाव ना महालाची
महाल ही मग भग्न भासतो जेंव्हा नसतेस तू

सावलीच माझी झाली अंधार झेला यला हा
सांगितले मी उन्हाला त्यालाही पुरतेस तू

रांधलेस किती कष्ट झिजली अशी दिन राती
गंध केवडा हिरमुसला जेंव्हा खुलतेस तू

रापले हे हात तुझे माझ्या कमनशिबी झळाने
अंकुर पुन्हा नव्याने सूर्यात पेरलेस तू

©Shankar Kamble #गझल #गझले #गझलेची #तू #तू_आणि_मी #प्रेम #प्रेम #प्रेमकवि 

#FindingOneself

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile