Nojoto: Largest Storytelling Platform

New तळ बांधले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तळ बांधले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तळ बांधले.

Stories related to तळ बांधले

    LatestPopularVideo

Vrishali G

बांधले मी बांधले इंद्राचे तोरण बांधले.. चित्रपट सर्वसाक्षी.. आशा जी #मराठीकविता

read more

Simran

viraj gosavi

तळ कोकणातल्या शिमग्यात बबलीचा धुमशान #मराठीसंस्कृति

read more

Shankar Kamble

साचलेले बरेचं काही
खोल मनाच्या गूढ तळाशी
गाठ उकलण्या सैल धागे
सोड मौन तू बोल स्वतःशी..

काजळ काळे भरले अंबर
अवचित आली वळीवाची सर
जीर्ण पानगळ त्यागून आता
नवलाईचा फुलू दे मोहर..

द्यूत रंगले मनःपटलावर
मनाजोगते दान पडेना
चितारलेले चित्र देखणे
कुठे हरवले?का सापडेना?

नजरेला दे नजर तुझ्या तू
दर्पणात निरखून स्वतःला
घे भरूनी पोलाद मनगटी
चेतवून बघ सामर्थ्याला..

पाझरते बघ एकसारखी
अथांग थरथर स्पंदनाची
तख्त पालथे निशाण फडके
आव्हान ,गर्जना दे बंडाची..

©Shankar Kamble #SunSet #मन #तळ #बोला #मोकळे #आकाश #स्वातंत्र्य #पंख #वारा

Shankar Kamble

*गढूळ झाले तळ मनाचे*
*आटून गेले नितळ झरे*
*ओलं सरता उरल्या भेगां*
*खोल उमटले घाव,चरे..!*

*रणरणणाऱ्या उन्हांत आता*
*झुळूक हरवली कुठेतरी*
*पदोपदी पेरले निखारे*
*फुंकर भासे दाह परी..!*

*आपल्याच जखमां कुरवाळीत*
*किती दिलासे उसने,खोटे*
*लपेटली जरी भळभळ ओली*
*सल मनाची मनांत दाटे..!*

*भार वाहूनी झाडं ही थकले*
*ऋतू बदलले काळ ओसरे*
*सुने घरटे काय उरले?*
*पंख फुटता दूर पाखरे..!*

*काय भरवसा फिरुनी येतील?*
*कोसळल्यावर टिपे गाळतील?*
*उन्हं जगाचे चटके देईल*
*पंखाची उब शोधत बसतील..!*

©Shankar Kamble #Foggy #गढूळ #तळ #माया #प्रेम #वेदना #वेदनांचागाव #काठावर

Bhavesh Lokhande

अगम्य बुद्ध प्रेम आयुष्य मन तळ भावेश भावेश_मुन्तज़िर love life

read more
इथले असले अनाठायी ...कसले कुठले केव्हाचे हे सारे संचित... देवळाच्या कळसावरचे कावळे तसे विचार... आत झोपतो एक बुद्ध शांत... पण तो खूप खोल आत... तिथला प्रवास नाही झेपत... बुद्ध नाही सापडत...  त्याचे अधोन्मलित नयन... त्याचा धीरोदात्त चेहरा... अगम्य तिच्या वागण्याचे हे सारे ओझे वाहताना तो दगड होत जातो...त्याच्या होण्याचे न होण्याचे मग उरत नाही महत्व... अस्तित्वहीन मग तो धावत राहतो अश्वथाम्यासारखा... डोक्यावर भळभळणारी जखम घेऊन... मरहम मागत फिरतो... आपल्याच भगव्या शेल्याची शकले करत... त्या चिंध्या कपाळावर बांधत... मग रात्रीला चंद्र बघवत नाही अन दिवस होतो दिवाभीत... एका वादळाला छातीत भरत तो हेलकावत हवा होतो...जन्माचे सारे दावे मग एकदाच उभे राहतात न्यायाच्या प्रतीक्षेत... त्याने कुणाकुणाला खुश करावे जो स्वतःच दुःखाच्या गर्दीशीत विस्कळून पडलाय... तिच्या संदर्भांत देखील नाही... ना तिच्या बोलण्यात त्याचा ओझरता उल्लेख... या कसल्या शिक्षा... विधात्यापेक्षा का मोठे मुन्सिफ ते दोघे... कुठले हे दावे... कुठल्या या शिक्षा...
  ज्वालामुखी दडवलाय त्यांनी मनांत... तिच्या मनात कमालीची चीड आहे त्याच्यासाठी... त्याने असे तोडून टाकायला नको होतं तिला कधी... त्याला राग आहे तिचा प्रचंड... पुन्हा एकदा नको का बोलायला होते तिने... एखादे खेळणे तोडावे तसे तोडले त्याने तिचे मन... अन पुन्हा तिच्याकडे वळून हि नाही पाहिले... तीही गेली रागावून... अपमानाचे कढ अंतरी दाबून...
 तिच्या उधाणलेल्या श्वासांच्या लाटा...अन दूर किनाऱ्यावर त्याचे नाव... लांब चाललेलं त्याचे गाव... पुसटसा तो... तिच्या आत असतो नेहमी...
चदरियां झिनी रे झिनी... 
-भावेश #अगम्य #बुद्ध #प्रेम #आयुष्य #मन #तळ #भावेश #भावेश_मुन्तज़िर #love #life

Sarita Prashant Gokhale

ढग भरून आल्यावर आठवणी दाटून येतात, बरसताना पाऊसधारा तळ मनाचा गाठतात.. ©️स्मिता कुलकर्णी - ढोनसळे #मराठीशायरी

read more

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे मनाचा तळ गाठायला.. #मनाचातळगाठायला चला तर मग लिहुया. तुमचे सुंदर विषय कमेंट करा. लिहीत राहा. c #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
मनाचा तळ गाठायला,
प्रथम मनाची खोली पहावी लागते.
मनाच्या खोलवर एकदा पोहोचलो की,
मनाचा तळ गाठायला सोपे जाते.
मनापर्यंत कुणीही पोहोचत असे,
मनात पोहोचणे कठीण जाते.
आणि जर का मनात कुणी पोहोचले,
तर मनाचा तळ गाठून तिथेच रुतून बसते.
कठीण होते मग अशी व्यक्ती मनातून उतरणे,
शक्य नसते मग त्या व्यक्तीस कधी विसरणे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
मनाचा तळ गाठायला..
#मनाचातळगाठायला
चला तर मग लिहुया.
तुमचे सुंदर विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#c

अल्पेश सोलकर

मालकाने आकडे समोर आणले.. जमवाजमव करून संख्येत बांधले.. आजकाल घरी एकटे पडलेले आकडे कोटींच्या पॅकेज पर्यंत पोहचले.. © अल्पेश सोलकर #yqtaai yq #yqbaba #alpeshsolkar

read more
मालकाने आकडे समोर आणले..
जमवाजमव करून संख्येत बांधले..
आजकाल घरी एकटे पडलेले आकडे
कोटींच्या पॅकेज पर्यंत पोहचले..

 मालकाने आकडे समोर आणले..
जमवाजमव करून संख्येत बांधले..
आजकाल घरी एकटे पडलेले आकडे
कोटींच्या पॅकेज पर्यंत पोहचले..
© अल्पेश सोलकर
#yqtaai #yq

अल्पेश सोलकर

भूतकाळाने हात बांधले.. भविष्याने हात वर केले.. काहीच चूक नसताना.. वर्तमानाला सोसावे लागले.. © अल्पेश सोलकर #भूतकाळ #वर्तमानकाळ #भविष्यकाळ # #चूकनसतानाही #alpeshsolkar

read more
भूतकाळाने हात बांधले..
भविष्याने हात वर केले..
काहीच चूक नसताना..
वर्तमानाला सोसावे लागले.. भूतकाळाने हात बांधले..
भविष्याने हात वर केले..
काहीच चूक नसताना..
वर्तमानाला सोसावे लागले..
© अल्पेश सोलकर
#भूतकाळ #वर्तमानकाळ #भविष्यकाळ 
#
loader
Home
Explore
Events
Notification
Profile