Find the Latest Status about टपटप टपटप पाऊस पाणी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, टपटप टपटप पाऊस पाणी.
nisha Kharatshinde
आज मी अन् तो (पाऊस) तो बरसतच होता मनसोक्त माझ्याशी गप्पा मारत.. मी ही बाल्कीनीतून हसत त्याला होते न्याहळत दिवसभर बोललो आम्ही सांज व्हायला लागली होती रात्रीही येणार का रे हो...गर्जना ऐकू येत होती कसे गेले वर्ष अखेर त्याने मला विचारले फक्त तुझीच प्रतिक्षा सोड...तूला खूप आठवले गंधाळल्या दाही दिशा आज मी ही मंत्रमुग्ध जाहले त्या चातकासारखीच मी ही आज खरी तृप्त झाले तो ही ऐकून हसू लागला वाट त्यानेही पाहिली होती अंधार सगळीकडे पसरला तितक्यात आईने हाक मारली होती ✍️(निशा खरात/शिंदे)काव्यनिश ©nisha Kharatshinde आज मी अन् तो(पाऊस)
Durga Deshmukh
पाऊस पाऊस हा क्षणाचा बंधन युगायुगाचे चांदण्यात फुललेले प्रेम तुझे माझे चालतात श्वास तोवर ऐकमेकास जीव लावु प्रसंग येता एखादा जोडीन श्वास माझे नेहमीच आपल्या वसंत स्वागताला मानु चल आज आभार श्रावणाचे प्रेमाची सावली शोधण्या बेजार झालो दोघे सांभाळुन घेतले उपकार त्या उन्हाचे किती खटाटोप केला तुला भेटण्यासाठी झाली भेट तर जगु जीवन माणसाचे ©Durga Deshmukh #Broken पाऊस
Durga Deshmukh
भावना उचंबळून येतात तेव्हा डोळ्यात येऊन बसतो पाऊस आनंदाने मन भरुन येताना गालावर हळुच नाचतो पाऊस 1 आठवणीत तुझ्या सख्या डोळ्यात थिजुन बसतो पाऊस कधी रडवतो खुप मनाला कधी ह्दयात हसतो पाऊस 2 सांगता येत नाही वेदना तेव्हा मुका होऊन बसतो पाऊस रात येते तुझ्या शिवाय विरहाने व्याकुळ डसतो पाऊस 3 अंगावर पडता रिमझिम धारा मनात माझ्या ठसतो पाऊस चिंब चिंब भिजुन मला बाहुत तुझ्या कसतो पाऊस 4 कधी हसवतो कधी रडवतो कधी वेडाच असतो पाऊस तुझ्या आठवणीत रडुन सुद्धा कधी येत नसतो पाऊस 5 दुर्गा देशमुख ©Durga Deshmukh पाऊस
Devanand Jadhav
अश्रु सरींना पाहून पाऊस थेंब दाटले सरी समवेत माझ्या अश्रूत सामील झाले •देवानंद जाधव• धामणी, पुणे. ©Devanand Jadhav अश्रु सरींना पाहून पाऊस थेंब दाटले... #कविता #poem #insta #Poet #Whatsapp #whatsappstatus #marathi #MarathiKavita #viral #चारोळी
हरिश्चंद्र धिवार
कुठे कुठे पुराने तर प्रचंड कहर केला अन कुठे कुठे बळीराजा जहर प्याला.. ® लोककवी डॉ. हरिश्चंद्र धिवार,मुंबई. ©हरिश्चंद्र धिवार असाही एक पाऊस...😟
Sharmila'S Diary
☬पाऊस आणि तुझी आठवण☬ चिंब भिजुन पावसात मन जाऊन बसतं ढगात मोहरतात साऱ्या भावना आठवणींच्या कृष्ण-धवल जगात विजांसोबत सुरु होतो मग ढगांचा लपंडाव आठवणींनी पुन्हा गजबजतो माझ्या मनातील उजाड गांव कधी साकारते इंद्रधनु उन्हासवे ओल्या पावसात आठवणींना मग येतो बहर रंगांनी सजल्या दिवसात ओंजळीत गर्द अळवाच्या चमकतात थेंब तेजाचे आठवणींच्या धुंद धुक्याला नवकोंदण तव प्रेमाचे कधी संतत धार पावसाची कधी साथ तिस वादळाची कधी फुले बाग आठवांची कधी वाहे सरिता आसवांची सागराचा उग्र अवतार सोबतीस पर्जन्य वारा आठवांच्या रोखण्या ऊधाणा तोकडा मनीचा किनारा दररोज घडे श्रावणात मेळ ऊन पावसाचा सोबतीस माझ्या सदैव हा खेळ संचिताचा ©Sharmila'S Diary पाऊस आणि तुझी आठवण #Barsaat #पाऊस #rain #IMissYou #Love #Poetry #Nojoto #nojotopoetry #uwots #sharmilasdiary
Dileep Bhope
अंगणात माये किती पडतो पाऊस जावू दे बाहेर, सर्दी नाही ना होत.. छपरावर धारा आल्या दुडुदूडू धावत घसरंडा उंबऱ्यात धर ना माझा हात सांग वल्ली कसी गं होतील कापडं काढून सदरा इजार, घालतो लंगोट धुवून गेले रस्ते बघ झाले चकाचक सोडू दे ना नाव या वाहत्या पाण्यात अंगणात माये किती पडतो पाऊस जावू दे बाहेर, सर्दी नाही ना होत.. ©Dileep Bhope #पाऊस
Vrishali G
पावसाचे धुंद दिवस धुक्याच्या दुलईत लपेटलेले माझ्या नजरसमोर येतेय एकच तुझे रूप छत्री घेऊन दुर दुर चाललेले ©Vrishali G पाऊस