Nojoto: Largest Storytelling Platform

New पाऊसा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पाऊसा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पाऊसा.

Stories related to पाऊसा

    LatestPopularVideo

Shankar kamble

*झाकोळले नभ* 
 *पिसाटला वारा* 
 *आसावली धरा* 
 *मीलना अधीरा...* 
                         *अवेळी धिंगाणा* 
                          *अल्लड सरींचा* 
                            *भिजल्या पंखांना* 
                              *ध्यास घरट्याचा...* 
 *गंधाळली माती* 
 *कस्तुरी सुवास* 
 *भेगाळल्या मनां* 
 *अंकुरली आस...* 
                           *कुंभातून आल्या* 
                      *झरझर सरी* 
                        *शिंपले अमृत* 
                           *माळरानावरी...* 
 *ओघळ पाण्याचे* 
 *खळखळ भारी* 
 *नाद उन्मेषाचा* 
 *चेतवला उरी...* 
                    *प्रसवली भूमी* 
                    *तरारले बीजं* 
                    *जपलं उदरीं* 
                           *स्वप्नं तुझं माझं...*

©Shankar kamble #पाऊस 
#पाऊसधारा 
#पाऊसाततुझीआठवण 
#नभ 
#पाऊसाचा 
#पाऊसाला 
#पाऊसावर

Shankar Kamble

*काळया मेघुटांचा भार* 
 *गंध दरवळ मातीला* 
 *ओली हिरवाई माखली* 
 *सांज भुलली उन्हाला..* 

 *कोंब कोंब तरारले* 
 *झाली पोटुशी धरणी* 
 *पान्हा अमृत पाजते* 
 *जणू पाडसा हरिणी..* 

 *पायवाट हरवल्या* 
 *जुनी ओळख पुसली* 
 *ओंजळ आठवांची* 
 *कुठे मनांत दाटली..* 

 *शुभ्र धुक्याची चादर* 
 *नक्षी सजली कोवळी* 
 *रोमरोमी देहांतूनी* 
 *दाटे नवीन नव्हाळी..* 

 *निळे डोळे मोरपंखी* 
 *आले भरून पिसारा* 
 *किती साठवू पाऊस* 
 *रिता मनाचा गाभारा..*

©Shankar Kamble #पाउस #पाऊसाततुझीआठवण #पाऊसाला #पाऊसधारा #पाणी #सर #पाऊस_पडून_गेल्यावर 

#rain

Shankar kamble

*दशाक्षरी काव्यरचना.* 
 *मेघ दाटले....* 
 *मेघ दाटले काजळ काळे* 
 *मनी हर्षाचे झुले उमाळे* 
 *मोर पिसाचे फुलले डोळे* 
 *मातीचाही गंध दरवळे* 

 *वाट पाहिली चातकापरी* 
 *अलवार येती मृगसरी* 
 *तनां-मनां या भिडल्या धारा* 
 *सूर अवचित ओठावरी* 

 *थेंब नाचे टपटपणारे* 
 *खळखळ नादे जळभारे* 
 *अवखळ चंचल हे वारे* 
 *सृजनाला ये उधाण सारे* 

 *बीज अंकुरे धरणी पोटी* 
 *येती जुळूनी मीलन गाठी* 
 *साज मखमली झऱ्या काठी* 
 *इंद्रधनू मग येई भेटी* 

 *पानोपानी छटा उमटल्या* 
 *गर्द पोपटी हिरव्या ओल्या* 
 *बहरून आल्या नभांगणी* 
 *घन सावळ्या हरिणी न्हाल्या*

©Shankar kamble #पाऊस 
#पाऊसधारा 
#पाऊसाततुझीआठवण 
#पाऊस_पडून_गेल्यावर 
#पाऊसाला 
#थेंब 
#थेंबाचे 
#सरी

Shankar Kamble

सये सर पावसाची आली अवचित आज
मृदूगंध शहारतो नव्या नवतीचा बाज

थेंब टपोरी, बिलोरी घर ,आंगण भिजले
नक्षी माळता मोत्यांचे देह तरुंचे सजले

शीरशीर अलवार काटा फुटतो कोवळा
बीजं रुजता मातीत सुखं स्वप्नांचा सोहळा

देह, गात्रांत साठवं ओल  मनांच्या तळाशी
श्वास श्वासांत भारता लाट पारखी जळाशी

मोर पिसारा फुलता डोळे भरले नभाचे
शुभ्र कोंदण लाभले दान पावले मनाचे

घेई भरून ओंजळ खोल भिजू दे पाऊस
पाठशिवणीचा खेळ नको परत जाऊस

©Shankar Kamble #zindagikerang #पाऊस #पाऊसधारा #पाऊसाततुझीआठवण #पाऊसाला #सर #धारा #पाऊस_आणि_आठवण #पाऊसआला #पाऊस_आणि_प्रेम

कवी विकास गोविंद पाटील

रिमझिम पाऊसात #poem #nojotophoto

read more
 रिमझिम पाऊसात

kaushal kamble

पाऊसातील एक वेगळा क्षण.... #nojotophoto

read more
 पाऊसातील एक वेगळा क्षण....

Prajval Nargade

पाऊस आणि समूद्राची मैत्री #पाऊसाआणिसमूद्राचीमैत्री #poem

read more
पाऊस तेव्हा पण होता
जेव्हा दोघे नकळते होते
कळायला तर फक्त 
पाऊस आणि पावसात 
खेडनारी
मित्र मैत्रिन होतो
समोर पाऊस सूध्दा 
समूद्रात येऊन मिळाला
आनंद तर खूप होता
दोघांच्या मिळण्याचा
त्या रिमझिम पावसाला
पण ती रात्र
जेव्हा समूद्र चालन बंद करायचा
तेव्हा पाऊस गूदमरायचा
आणि चालत असतांना 
समूद्राचा लाटा
पावसाला किनार्याच्या 
दगडांवर आपटायचा
पाऊस हा वाट शोधायचा 
माय सारख्या ढगाची
अंकूरले ते फूलही 
जमिनी वरती
आला जेव्हा सूर्य तो
धरती वरती
बाष्पाने ही दिली 
साथ ढगाला
सूर्याने ही मारली हाक
प्रज्वलीतला
हो आहे ना मनाला???
तेव्हा पण पाऊस धरती वरती आला
जेव्हा दोघे नकळते होतो आणि
आज पण 
जेव्हा कळले होते या मनाला पाऊस आणि समूद्राची मैत्री
#पाऊसाआणिसमूद्राचीमैत्री

kalyani dhabale

.....तुला बरसताना बघुन.....

तुला बरसताना बघून...
मन चिंब चिंब होते...
बरसताना तू नभा
ढग आठवणींचे माझ्यात दाटते... 
   तुला बरसतना बघून 
    दुःख ही वाटते
    तू येतोस पण जाशील
    ही भीती राहते. 
तू बरसत असताना 
अश्रुंच्या वाटा मोकळ्या असतात
तू गेलास की मात्र
मी परत येकटी पडते...
म्हणून तू जाशील ही 
भीती राहते...



_kalyani dhabale #पाऊसाततुझीआठवण #Nojototell #myquote #love

Ganesha Devkule

एका पाऊसात दोघांनी भिजायचं #rain #मराठीकविता

read more
सांग ना जरा बोललं ना जरा
मनातलं गुपित
सांगशील का
मला तू येऊन भेटशील का
कस कवा कुठ भेटायचं
एका पाऊसात दोघांनी भिजायचं

©Ganesha Devkule एका पाऊसात दोघांनी भिजायचं 

#rain

Ravidesai02

loader
Home
Explore
Events
Notification
Profile