Nojoto: Largest Storytelling Platform

New आयुष आयुष Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आयुष आयुष from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आयुष आयुष.

    LatestPopularVideo

hemlata mandle

Shankar kamble

*खळखळ होवून मुक्त झऱ्याची* 
 *आयुष्याचे गाणे गावे* 
 *रंग बेगडी खोडून सारे* 
 *आत्मरंगी रंगून जावे* 

 *पंख देवूनी मनःपाखरा* 
 *स्वच्छंदी गगनात फिरावे* 
 *गुरफटून कोशात स्वतःच्या* 
 *भार प्रौढी उगा वहावे* 

 *आव्हानांना भिडवीत डोळे* 
 *तुफानांना तुडवीत जावे* 
 *निधड्या छातीवरती झेलीत* 
 *संकटावरी कोरीत नावे* 

 *विखुरलेल्या स्वप्नांचे* 
 *मोती-मोती वेचीत जावे* 
 *सर गुंफूनी स्वयें तयांचे* 
 *भार कंठी मिरवीत गावे* 

 *कशास चिंता व्यर्थ उद्याची* 
 *मृगजळी का उगा फसावे* 
 *रीती ओंजळी क्षण निसटती* 
 *शल्य शेवटी काय असावे?* 

 *ताल-सूर जरी आज हरवले* 
 *गीतं तरी ते मनीं ठसावे* 
 *आळवून त्या रंम्य लकेरी* 
 *कैक मैफीली सूर सजावे*

©Shankar kamble #आयुष्य #जगणे #जीवन #आयुष्य_जगताना 

#Thoughts

Shankar kamble

आयुष्य_जगताना जीवनअनुभव जग आयुष्य Rewind2021

read more

Shankar kamble

जीवन जीवनअनुभव आयुष्य आयुष्य_जगताना rain

read more
डोळ्यास डोळे भिडवून आता
आव्हानांना देवू उत्तर
उधळून टाकू दाही दिशांना
आयुष्याचे गंधित अत्तर

गोळा बेरीज कशास खोटी
विखुरलेल्या स्वप्नांची
डाव नवा मांडून खेळू
नवीन बाजी जीवनाची

नवीन घरटे नवी उभारी
नकोच चिंता उगा फुकाची
पंख पसरूनी स्वैर गवसणी
तमां कुणा मग क्षितिजाची

साखळदंडी जखडून गेले
मन कितीदा कातर झाले
तोडून बेड्या युगां -युगाच्या
स्वानंदी मन धुंद न्हाहले

झडू दे नौबत आता यशाची
नवीन नांदी नव्या युगाची
पाईक तू नवं विचारांचा
झटकून मरगळ जुनेपणाची

©Shankar kamble #जीवन #जीवनअनुभव #आयुष्य #आयुष्य_जगताना 

#rain

hemlata mandle

"चांगल्या वेळेपेक्षा चांगली माणसं महत्वाची असतात....... चांगल्या वेळेमुळे चांगली माणसं भेटतीलच असे नाही......
कारण चांगल्या माणसांमुळे चांगली वेळ
येऊ शकते.......

©hemlata mandle #kinaara #indianpictures #india🇮🇳 #Indian_kavi #आयुष्य #आयुष्याच्या_वाटेवर

yogesh atmaram ambawale

शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे आयुष्याची परीक्षा... # आयुष्याचीपरीक्षा हा विषय Amar Bhilare यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आयुष्याची परीक्षा प्रत्येक वळणावर होते,
कुठला कालावधी मर्यादित नसतो तिला,ती केव्हाही होते.
आयुष्याच्या ह्या परीक्षेत तीच व्यक्ती उत्तीर्ण होते,
ज्या व्यक्तीने आयुष्याला खूप जवळून अजमावले असते.. शुभ रात्री मित्रहो
आताचा विषय आहे

 आयुष्याची परीक्षा...
# आयुष्याचीपरीक्षा

हा विषय
Amar Bhilare यांचा आहे.

Shankar Kamble

*भावार्थ काय शोधू आयुष्य वेचताना भाग्य इतुके लाभले मज भाव कोवळे जपताना* ...

 *लवलेश ना लयाचा आरंभ अंत पार* 
 *हसऱ्यां फुलांसवे मी नितं स्वच्छंदी रमताना* ...

 *उकलली मनाच्या खोल तळाशी* *खूणगाठ बांधलेली* 
 *शहाण्यांच्या जगात वेडा मी एक हासताना* ...

 *सांज होता उडून गेले पंख पसरूनी* *क्षण निसटले* 
 *कशास गुंता उगा सोडवू शांत स्तब्ध मी खग बघताना* ...

 *जीवनरस हा नितं प्रवाहित खंड त्याला कदा नसे* 
 *सुखदुःखाचे गरळ पचवूनी प्रवाही स्वैर तो वाहताना...*

©Shankar Kamble #आयुष्य #जीवन #जीवनअनुभव #जगणे_येथे_महाग_झाले #जीवनगाणे #जीव #आयुष्य_जगताना 
#Drown

Titkare Pratiksha Sadashiv

पुस्तकी प्रश्न उत्तरांना पुरवणी मिळेलही...
पण आयुष्यातील प्रश्नांना, 
पुरवणी मिळेलच अस सांगता येत नाही, 
आणि मिळाली तरी 
पुरवणी पुरेलच याची खात्री देता येत नाही.

                                         -प्रतिक्षा सदाशिव तिटकारे #आयुष्याचीपुरवणी

Ayush Chaturvedi

कुछ लोगो ने मुझमें 
इतनी कमियां निकाल दि है
कि अब मेरे पास खूबियों के
अलावा कुछ नह बचा है #आयुष_चतुर्वेदी

शब्दवेडा किशोर

#कधीकधी असंही जगावं लागत....
आजकाल जगताना आसवांना पायाखाली घेऊन चालावं लागतं
मन आपलं घरातल्या खुंटीला बांधुन ठेवावं लागतं
आपल्या सर्व इच्छांना तनामनात साठवावं लागतं
काही वेळी इच्छेला पायदळी तुडवावं लागतं
वेळ ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाला न्याय देते
त्या वेळेसाठी कधी कधी स्वतःला सुद्धा गमवावं लागतं
फारच कमी लोक दुसऱ्याचे दुःख समजतात
पण कधी कधी दुःख जड मनाने गिळावं लागतं
आयुष्य खूप सुंदर आहे अस सर्व जण म्हणतात
पण इतभर पोटाला लागणाऱ्या भाकरीसाठी
कित्येकांना रस्त्यावर अन् दारोदार फिरावं लागत
शहरे खुप सुंदर असतात असं प्रत्येकालाच वाटतं
घड्याळाच्या काट्यासम जीवन शहरात जगावं लागतं
शुद्ध हवा अन् निर्मळ माणसं आजकाल शहरात भेटत नाहीत
त्याला कधी तरी गावाकडं येऊन बघावं लागतं
आजकाल कुठंच आपल्या
अस्तित्वाच्या पाउलखुणा टिकतच नाही
कारण जो तो पैशामागं धावतोय
त्यासाठी कधीतरी आहे त्या वयापेक्षा
जरा लहान होऊन
अन् आपल्याच धुंदीत बेधुंद होऊन अन्
जगाची फिकीर सोडत मस्त
मनमुराद जगावं
लागतं......
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #आयुष्य_नावाचं_विद्यापीठ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile