Find the Latest Status about नामाचा गजर गर्जे पंढरपूर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नामाचा गजर गर्जे पंढरपूर.
Rutuja Ghume
आषाढी एकादशी च्या माझ्या मित्र आणि मैत्रिणीनां हार्दिक शुभेच्छा... मग आज विठ्ठलांच्या नामाचा गजर करत असाल ना? विठ्ठल विठ्ठल... #विठ्ठल #वि
Ramdas Narwade
भंक्तांची आषाढी कोरोना मुळे बंद आहे पांडुरंगाची वारी टाळ मुर्दांगात दुमदुमत नाही ती पंढरी कमी असेल हर्षउल्हासित सहकीर्तनाची विठू नामस्मरणाची लाखो मधुर वाणी हरीभक्त पारायण वैष्णवांची गोड गाणी विठूनामाचा गजर करणारे वारकरी माय बाप विठ्ठल चित्ती ध्यानी मनी घरीच मनोभावे साजरी करे भक्तांची आषाढी भक्तीच्या जोरावर पंढरीनाथा साद घाली विटेवरचे पाऊल उचलून भक्त दर्शना येती माऊली दर्शन भक्ता देउनी धन्य करी महा एकादशी माय विठ्ठल...बाप विठ्ठल.. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏 ®रामदास नरवाडे #आषाढी #एकादशी #विठ्ठल #पंढरपूर #वारी #corona #lockdown
Shankar kamble
आसावला जीव।ओसंडला भाव। अंतरीचा ठाव।सावळ्या तू।।१।। कातर मनाला।आठवं क्षणाला। काकडा ओवला।देहरूपी।।२।। मनं ओढावते।दर्शनांते आस। जीवां रात्रंदिस।ध्यास तूझा।।३।। तोडीयले बंध।पाश मायारुपी। अंतरी स्वरूपी।तूच सदा।।४।। काय करू सांग।चित्त उसवले। पाहतो वाटुले।पंढरीची।।५।। अंतरी उमाळा।तोची घननीळा। सांगू लडिवाळा।गूज मनीं।।६।। नाद प्रसवला।परब्रह्म देहीं। मनाचियां डोही।नाद रंगे।।७।। देहादेही एक।भाव समरूप। पापांचे कळप।सुटती बां।।८।। मागणें न दुजें।आतां उरे काही। मनीं वसे ठायी।पांडुरंगे।।९।। श्री. शंकर नागनाथ कांबळे ©Shankar kamble #वारी #विठ्ठल #पंढरपूर #माऊली #वारी_जांऊ #पांडुरंग #विठ्ठल_रखुमाई #सावळा
Shankar Kamble
*संत सज्जनांचा भार* *वैष्णवांची मांदिआळी* *वाळवंटी भीमा तीरी* *नाद मृदंग चीपळी!!१!!* *विरक्तीचा भाळी टिळा* *करी वैराग्य पताका* *षडरिपुंचा काकडा* *होय तूच ज्ञाना, तुका!!२!!* *मुखी यज्ञ नाम घोष* *फिटे संसार पारणे* *नेत्रं तृप्त सुखावती* *रूप सावळे देखणे!!३!!* *घेतां चरणांशी मिठी* *बंध प्रारब्ध तुटले* *गळागळी भेट झाली* *माझे "मी"पण सुटले!!४!!* *दीन पतीत दुबळा* *आतां एकची मागणे* *पुन्हा नको जन्म फेरा* *विठू हेची रे सांगणे!!५!!* ©Shankar Kamble #वारी #विठ्ठल #विठ्ठल_रखुमाई #वारी_आयुष्याची #वारी_जांऊ #पंढरपूर #कृष्ण #NojotoRamleela
Shankar Kamble
पंढरीच्या वाटे!भार वैष्णवांचा! सोहळा सुखाचा! अनुपम!* माया मोह बंध! उतरले पार!* तरला सागर !जड जीवा!* देहाची ना शुद्ध! चित्त गुंतलेले!* नामात दंगले !रामकृष्ण!* *मुखी घेता नाम !शीण हा सरला! भरून उरला! देहांघटी!* सवे चालवितो !भार तो वाहतो!* नेत्रां दाववितो! पाप पुण्य!* ओढ अंतरीची !अंतराला ठावी!* गळाभेट व्हावी !मनीं आस!* *पायी लोटांगण !आसवे प्रक्षाळी! चरणे सावळी !विठुराया!* कंठ सद्गगदित !भाव ही खुंटले!* विकार लोपले! दर्शनाते!* ©Shankar Kamble #वारी #विठ्ठल_रखुमाई #विठ्ठल_विठ्ठल #वारी #वारी_आयुष्याची #दिंडी #पंढरपूर #विठ्ठल
Kunal Salve
तुझ्या पायातलं पैंजण माझं पहाटेचं गजर झालं की, माझ्या आयुष्याची कायमची सकाळ होईल ! 😍 #pc_google #गजर #alarm #पैंजण #सकाळ #पहाट #yqtai #नगर
Rashmi Hule
विठ्ठल विठ्ठल नाम घेता घेता चालती पाउले जराही न थकता वारी ती पोहोचली पंढरीस आता आतुर दर्शनास, दिसे तो विठू भक्ता दिसली ती 'माऊली' फिटे पारणे डोळ्यांचे वारी करुन पंढरीची सार्थक उभ्या जन्माचे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल आषाढी एकादशी च्या माझ्या मित्र आणि मैत्रिणीनां हार्दिक शुभेच्छा... कस काय मित्रानों मग आज विठ्ठलांच्या नामाचा गजर करत असाल ना? माहीतीय मला म
yogesh atmaram ambawale
पाठीशी माझ्या सतत मायेची सावली ती म्हणजे साक्षात माझी विठू माऊली. विठ्ठल 🚩विठ्ठल 🚩 आषाढी एकादशी च्या माझ्या मित्र आणि मैत्रिणीनां हार्दिक शुभेच्छा... कस काय मित्रानों मग आज विठ्ठलांच्या नामाचा गजर करत असाल ना? माहीतीय मला म