Nojoto: Largest Storytelling Platform

New आठवण Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आठवण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आठवण.

    PopularLatestVideo

Amol Gund

आठवणी आठवणींच्या #poem

read more
आठवणींच्या वाटेवरती जशी पावलं
चालू लागतात
आठवणींचे कोष सारे सभोवताली
जमू लागतात
क्षण एक एक त्यातील जागे होवू
लागतात
बदललेल्या सगळ्यांच्या वाटा
पुन्हा हळुहळु जुळू लागतात
आठवणी पुन्हा माझ्याशी तोच विषय
बोलू लागतात
झाल्याबद्दल आठवणींचा भाग
दिलगिरी व्यक्त करू लागतात आठवणी आठवणींच्या

Vinod Umratkar

कोपऱ्यात मनाच्या माझ्या
तुझी जागा ठेवलीय राखून।
आठवणी प्रेमाच्या तुझ्या
आहे सखे, सुरक्षित साठवून। #आठवणींचापसारा
 #आठवणींची_साठवणं 
#मराठीलेखणी 
#yqtaai 
#yqmarathi 
#mywordsmythoughts  #YourQuoteAndMine
Collaborating with Komal 😊

अॅड, महेंद्र तोंडे

तू...तुझी #आठवण आठवणीत माझ्या #तू.. #poem

read more
तुझी कायम वाट पाहीन मी,
 अगदी शेवटच्या श्वासा पर्यंत,
 या येकटे पणाशी दोन हात करत ,
जगेन मी तुझ्या आठवणीत 
तू परतून येशील या आशेवर तू...तुझी #आठवण
आठवणीत माझ्या #तू..

Pratik Patil Patu

आठवणींना आठवताना #Memories love #आठवण #अश्रू #yqtaai #bestmarathiquotes

read more
आठवणींना आठवताना......

तुझी आठवण हसवते
तुझी आठवण रडवते
तुझीच आठवण मनात येऊन
खूप काही करते.

जाळते ती मनाला
स्वतः न कधी ती जळते
आठवणींच्या दाहकतेने
डोळ्यात पाणी भरते.

तुझ्या आठवणी त्रास करतात
डोळ्यात माझ्या अश्रू भरतात
तरीसुद्धा, प्रेमळ नयन माझे
तुझीच स्वप्न पाहत असतात.

तुझ्यामुळे माझ्या डोळ्यात
 अश्रू आले, पण
माझ्यामुळे तुझ्या डोळ्यात
आनंद अश्रू येथील...

खूप प्रेम करतो तुझ्यावर.... आठवणींना आठवताना
#memories
#love
#आठवण
 #अश्रू
#yqtaai
#bestmarathiquotes

kavi Aniket Dabhade

@kavi_aniket_dabhade_

© Aniket Dabhade #Love #marathi #प्रेम #आठवण #आठवणी #Lines

Pravin P. Gaikwad

mute video

ChetaN Gangurde

तिच्या आठवणी जेव्हा दाटून येतात,
तेव्हा आसवांचा पूर ओसंडून वाहतो...

नजरेच्या किनाऱ्यामधून अलगद दोन थेंब ओझरतात,
आणि त्या पावसात मी चिंब भिजून जातो... #आठवणींचा_पाऊस

Dipak kolaskar

तिचा आलेला राग तिच्यावर कधी काढलाच नाही
तिच्यासाठी झुरणारं मन तिला कधीच कळलं नाही

बोलत होती,भांडत होती तस नातं आमचं जवळचंच
सारं काही कळायचं तिला,तिला फक्त मीच कळलो नाही.

नेहमी म्हणायची सांग तुझ्या मनात कोण आहे
ही आवडते,का ती आवडते तुझं प्रेम कोण आहे

मी सांगत नाही म्हणुन ती रुसायची माझ्यावर
आता कस सांगू तिला माझं तिच्यावरच प्रेम आहे.

आयुष्यात ती माझ्या खरचं वेगळी होती
प्रेमाचं जाऊद्या,तिची सोबती छान होती

एक मैत्रीण म्हणुन ती जपायची नात्याला
तिच्या मनातले सारे काही मला सांगत होती.

तिच्यावर असणार प्रेम तिला दाखवताचं आलं नाही
त्या वेडीवर मला साधं रुसताही आलं नाही

आली एक वेळ अशी आम्ही सारेच दुरावलो
आठवण येईल तुझी मला,तिला हेही म्हणलोच नाही.

                                                    दिपक कोळसकर

©Dipak kolaskar #आठवणीच्यापुस्तकातून

शब्दवेडा किशोर

पाऊलखुणा..

आठवणींच्या पाऊलखुणा
उजळून दिसतात जिथे  
खेळलो..बागडलो..रमलो
स्मरण होते जाताना तिथे..
स्मृतींच्या पाऊलखुणा
जात नाहीत विस्मृतीत 
सुवर्ण असतात त्या
तरळत येतात त्या कृतीत..
सर्वांनाच पडते भुरळ
त्या सोनेरी पाऊलखुणांची  
दिसता येता कमी जाणवते
हृदयातील त्या आठवणींची..
अशा असतात पाऊलखुणा
वळते पुन्हा तेथे नजर  
आठवण काढताच त्यांची
क्षणात होतात पुन्हा हजर..

©शब्दवेडा किशोर #आठवणींच्या_साठवणी

शब्दवेडा किशोर

कोलाज आयुष्याचं....
दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा..दिवाळी हा दिव्यांचा सण..अगदी सगळीकडे आनंदाला अगदी उधाण आलेले असते. घरातला कोपरा न कोपरा स्वच्छ होतो.जुनं काहीस जाऊन तिथं नवीन काही विराजमान होतं.आपल्याही मनावर आलेली मरगळ झटकली जाऊन नव्या आशेच्या दिव्यांनी आपल्या मनाची व घराची कवाडं उजळून टाकण्यासाठी आपण उत्सुक झालेले असतो.नवीन कपडे,उटणे,साबण यांच्या एकत्रित सुवासिक दरवळीने घरातले वातावरणही प्रफुल्लित झालेले असते.या आनंदावर सरताज होऊन मिरवली जाते ती आपल्या दारा पुढची सुबक रांगोळी..घराला लावलेला आकाशकंदिल..त्याच्या झरोक्यातुन डोकावणा-या त्या रंगाच्या विविध छटा..रांगोळीत भरलेले रंग त्यावर ठेवलेली मंद प्रकाशात तेवणारी पणती..जणु इंद्रधनुच्या सोहळ्याची प्रचिती आणणारी दिवाळीतील ती प्रत्येक संध्याकाळ..या सगळ्या आठवणीत रमताना मन लगेच बालपणात गेलं.दिवाळीच्या खरेदीत दरवर्षी दहा ते पंधरा रूपये रांगोळीच्या पुस्तकासाठी राखीव असायचेच.ठिपक्यांचा कागद, रांगोळी,रंग ही खरेदीही असायचीच.दुपारचे जेवण,फराळाचे पदार्थ करून झाले की प्रत्येक सखी गेरुने (लाल माती) आपापल्या घरासमोरील अंगणाचा काही भाग सारवुन सुरू करायची कलाविष्काराचा अनोखा सोहळा..या सोहळ्यात ठिपक्यांच्या कागदापासुन ते रांगोळीत भरायच्या रंगाचीही देवाणघेवाण हक्काने होऊन अंगणं रंगानी तर मनं समाधानानी भरून जायची.दोन तीन तास अगदी तल्लीन होऊन काढलेल्या  रांगोळ्यांनी प्रत्येक अंगण सजायचे.रांगोळी व रंगाची लाली प्रत्येक सखीच्या गालावरही दिसायची.आम्हा मुलांच्या लुडबुडीलाही अगदी आनंदाने सामावुन घेतलं जायचं.आमचं प्रशिक्षणही तिथं सुरु व्हायचं.पहिला धडा होता रांगोळी..चिमटीत पकडुन सरळ रेष आखायची..दिसायला सोप्पं वाटणारं काम करायला फारच कठिण होतं कारण एकतर हात थरथरायचा किंवा चिमटीतली रांगोळी आधीच संपायची पण हळुहळु शिकायचो आम्ही संयमाचा पहिला धडा..अन् मग चार ठिपके व ओळींपासुन सुरु झालेला तो अद्भुत प्रवास मुक्तहस्त रांगोळी पर्यंत कधी येऊन ठेपला कळायचं नाही.आपणच रांगोळीच्या आयुष्यासम रेखा आखुन ऐपतीनुसार रंग भरायचे.चुकुन कधी एखादा रंग दुस-या चौकटीत गेलाच तर त्यावर समाधानाची जाडसर पांढरी रेख आखुन वेळ साजरी करायची.चांगली रांगोळी काढणे ही कला तर आहेच पण ती सुरेख रंगसंगतीने सजवणं हे खरंं कसब आहे.ती आपल्याला रोजचे जीवन जगण्यासाठीचे तत्वज्ञान समजावते.रांगोळी अनेकविध रंगानीही सजवता येते किंवा दोनच रंग वापरुनही उत्तम सजते.गरज असते ती फक्त चांगल्या दृष्टीकोनाची..उदाहरणार्थ तुम्ही अतिशय सुंदर चविष्ट स्वयंपाक केला पण तुम्ही जर तो नीट पध्दतीने सादर केला नाही तर त्यातली गंमत निघुन जाते.याउलट तुम्ही दोनच पदार्थ केले असतील अन् जेव्हा तुम्ही ते छान पद्धतीने आनंदाने वाढता तेव्हा त्याची लज्जत काही औरच असते.रांगोळीचे रंग अन् आपल्या आयुष्याचा प्रवास असाच समांतर सुरू राहणारच आहे.रेखा चुकतील..रंगसंगती चुकेल..पण त्या चुकलेल्या गोष्टीतुन नवे अनुभव मिळतील..अगदी त्या सप्तरंगी रांगोळीसारखेच..माझ्या मते आयुष्यही असेच रोज नव्याने जगताना येणारे कटु अनुभव मनातुन सतत झाडुन टाकायचे म्हणजे कधीतरी रांगोळी सुंदर येईल अन् रंगसंगतीही मनाजोगती होईल अन् मग अशा सुरेख क्षणांचं कोलाज करून ते मनात साठवायचं व नंतर आयुष्याचं कोलाज जेव्हा जेव्हा चुकेल किंवा रंगसंगती बिघडे तेव्हा हे कोलाज आठवायचं..मग रांगोळी काय व आयुष्य काय..चुकणं अन् सावरणं दोन्ही सोप्पं होईल....

©शब्दवेडा किशोर #आठवणींच्या_पुस्तकातुन
loader
Home
Explore
Events
Notification
Profile