Find the Latest Status about पाहिले न मी तुला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पाहिले न मी तुला.
Priyanka Jaiswal
बालकामगार मी बालकामगार मी तुम्हाला काय सांगू माझी व्यथा, बालमजुरी करणे गुन्हा आहे, असेच म्हणते सारी जनता पण बालमजुरी करायची मी, का थांबाऊ सांग, त्याच्याशिवाय कशी विझेल, आमच्या भुकेची आग.. अंथरुणाला खिळून बाबा माझे झोपले आहे... 4 पैशांसाठी आई माझी, लोकांच्या घरी भांडी घासत आहे... लहान आहे बहीण खूप, कशी भागऊ सांगा तिची भूक... बघून माझ्या आईचे हाल, कप बश्या धुतो मी टपरीवर, हातभार लावण्यासाठी तिला, गजरे विकतो कधी सिग्नलवर.. आमच्याकडे बघून कोणी दाखवतो सहानुभूती, तर कोणी निघून जातो रागात... खूप काही सहन करावं लागत, जीवन जगण्यासाठी या जगात.. मुलांना श्याळेत जाताना बघून, वाटतो त्यांचा हेवा.. अशी ही गरिबी आम्हालाच का दिली तू देवा.... खेळण्याचे,शिकण्याचे वय आमचे, पण बालपण हे आमचे कधीच संपून गेले, सांग ना रे देवा अशे किती गुन्हे आम्ही केले... कशी समझवू मी तुम्हाला, परिस्थिती माझ्या मनाची... फक्त एकच दिवस नका दाखऊ मया,ठेऊन स्टेटस् मोबाईल वर बालकामगार दिनाची... ©Priyanka Jaiswal #बालकामगार मी
Sagar Bangar
कसे विसरावे मी तुला तुझ्या नकळत तू पेरलेले स्वप्न जागे आहे माझ्या नकळत ✍️लेखन:-सागर बांगर ©Sagar Bangar #चारोळी ❤️🥰 कसे विसरावे मी तुला तुझ्या नकळत तू पेरलेले स्वप्न जागे आहे माझ्या नकळत❤️ लेखन:-सागर बांगर©® .
nisha Kharatshinde
आज मी अन् तो (पाऊस) तो बरसतच होता मनसोक्त माझ्याशी गप्पा मारत.. मी ही बाल्कीनीतून हसत त्याला होते न्याहळत दिवसभर बोललो आम्ही सांज व्हायला लागली होती रात्रीही येणार का रे हो...गर्जना ऐकू येत होती कसे गेले वर्ष अखेर त्याने मला विचारले फक्त तुझीच प्रतिक्षा सोड...तूला खूप आठवले गंधाळल्या दाही दिशा आज मी ही मंत्रमुग्ध जाहले त्या चातकासारखीच मी ही आज खरी तृप्त झाले तो ही ऐकून हसू लागला वाट त्यानेही पाहिली होती अंधार सगळीकडे पसरला तितक्यात आईने हाक मारली होती ✍️(निशा खरात/शिंदे)काव्यनिश ©nisha Kharatshinde आज मी अन् तो(पाऊस)
Lotus Mali
........................................... ©Lotus Mali असेल मी नसेल मी तरीही तुझ्यात दिसेल मी ही प्रीत नाही फक्त माझी - तुझी हे नाते जुडलेले आहे आत्म्याचे आत्म्याशी -LotusMali https://lotussha
Sangeeta Kalbhor
श्वासांचा श्वासांना पडता विळखा.. कोणी सांगितले तुला मला काही वाटत नाही मन पेटलेले असल्यावर तन मुळी पेटत नाही हवा असतो मला नित्य सोहळा तनामनाचा थरार अनुभवायचा असतो प्रत्येक क्षणाचा लपेटून घ्यायचे असते तुला उबदार श्वासात नको असतो थोडाही दुरावा प्रणयी सुवासात विळख्यात तुझ्या अखंड डुंबून माळावा सुगंध भिडता नजरेला नजर यौवनाचा भलताच गंध कडाडावी शलाका रे तुझ्या हळुवार स्पर्शाने मी माळावा अवघा वसंत किती किती हर्षाने श्वासांचा श्वासांना पडता विळखा मंत्रमुग्ध व्हावे मला जे जे सांगायचेय ते न सांगता तुला कळावे सरसावून यावास तू मला घेण्या मिठीत सखया सामावता तुझ्या बाहूत क्षणही नको जावा वाया...... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor श्वासांचा श्वासांना पडता विळखा.. कोणी सांगितले तुला मला काही वाटत नाही मन पेटलेले असल्यावर तन मुळी पेटत नाही हवा असतो मला नित्य सोहळा तनाम
Sangeeta Kalbhor
मी काय म्हणते.. मी काय म्हणतेय तुला कळतेय कुठे तुझ्या ओसाड मनाला पालवी न फुटे जीव थांबला जीव रमला जीव शमला तू नाही रे , नाहीस ,नाहीस जीव जाणिला सहवासासाठी तुझ्या किती मी हरखायचे नानाविध प्रश्नांच्या उतरंडी मी उरकायचे काय मागितले तुला की तू जड झालास माझ्या शब्दांच्या सलोख्यालाही द्वाड झालास आता नकोय तू आणि तुझ्या प्रेमाचा ओलावा मी बरी आणि बरा रे माझ्या अंतरातला कालवा जमले तर जमव एवढे की मला विसरुन जा आला होतास शलाका बनून वारा बनून सरसरून जा.... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor #retro मी काय म्हणतेय तुला कळतेय कुठे तुझ्या ओसाड मनाला पालवी न फुटे जीव थांबला जीव रमला जीव शमला तू नाही रे , नाहीस ,नाहीस जीव जाणिला सहव