Find the Latest Status about हरवली आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हरवली आहे.
yogesh atmaram ambawale
पेंगतात डोळे,आळस ही येतो खूप झोप येते थकवा ही जाणवतो. पण पडता अंथरुणात,झोप उडून जाते डोळे जरी बंद असले तरी विचारात मन जागते. विचारांच्या गुंत्यांनी,सुखाची झोप हरवली आहे. झोपायला गेलो की,अनेक विचारात रात जागवली आहे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सुखाची झोप... #सुखाचीझोप चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
sandy
हरवली ती दिवाळी सण.. सण आपल्यासोबत नेहमीच आनंद,उत्साह आणि नवीन उमेद घेऊन येत असतात.. रोजच्याच धकाधकीमुळे निरुत्साही झालेल्या जीवनाला नवचैतन
Rajendrakumar Shelke
*का माणुसकी हरवली..!* *वर्णसंख्या(९/७/९/७)* *************************** का हरवली माणुसकी कळत नाही *खरे,* स्वार्थासाठी सरसावले ढोंगी पहा *चेहरे.* मीपणात विसरून गेले नात्यातील *अंतर,* मनालाही कळले नाही प्रेमातील ते *सार.* आज कुठे देव राहिला कोणालाही ना *कळे,* माणसातील खरा भाव सतत दूर *पळे.* रक्ताची नाती खरंतर फसवीच *निघाली,* समोरासमोर देखील खोटे बोलू *लागली.* स्वतःच्याच त्या स्वार्थासाठी माणुसकी *सोडली,* आपलेपणात मनाची व्यथा सारी *मांडली* ----------------------------------- *✍️ राजेंद्रकुमार शेळके.* -- नारायणगाव, पुणे. ©Rajendrakumar Shelke का हरवली माणुसकी
Vilas Bhoir
ओथंबल्या क्षणास पहाट साद घाली प्रहर होताच नव्याने सकाळ अवतरलेली दंगलेल्या स्वप्नात रंगून मन गेले निद्रिस्त देहालाही हलकेच जाग आली मंद वाऱ्याच्या झोक्यात तरु सावली भास्कराच्या येण्यात क्षणात फुलली कळी पानाफुलांवर दवबिंदूंचा ओलावा धुसट दिसे हरित-तृणांवर शोभती थेंब धुक्याचे मखमली रातराणी उमलून गंध पसरला अवेळी पांघरून धुके पूर्वेस आली लाली कधी सोनेरी कधी केशरी रविकिरणे अंगणातूनी थेट दारावरी अलगद न्याहली कुजबुज पाखरांची कधी अबोल पाखरबोली मोकळ्या आभाळी थव्यांनी नक्षी रेखलेली कोवळ्या उन्हाची झळ अंगावर बागडते शितल होऊनी पुन्हा दुरवर विरघळली धुक्यात हरवली वाट चंचल स्वप्नातली चालताच पुढे वळणावरी पाऊले उमटलेली दाटलेले धुके विरण्यास सज्ज झाले जवळपास जाताच वाट मोकळी झाली ~ विलास भोईर ( धुक्यात हरवली वाट ) धुक्यात हरवली वाट #CalmingNature
Sujata Darekar
कधी हरवली वाट धुक्यात कधी हरवली कुशीत रे गंध फुलांचा दरवळ होऊन निजले स्वप्न उशीत रे निळ्याशार डोळ्यांमधली शाई सरसर गळू लागली अन् स्पंदनांचे वेग कसे ते राहिले ना मुशीत रे कुजबूज झाली अधरांची गजबजले हे हृदय वेडे आनंदल्या आज असंख्य मनभावना खुशीत रे रगडता हे देह ओले वसंताची ती रम्य पहाट प्रसन्न झुलती वादळ वारे राहिले ना दुषीत रे स्वच्छ भोर निरभ्र नभी चांदण्या या खुलू लागल्या आलावरच्या खळीमधूनी सांगून गेल्या गुपीत रे सुप्रभात मित्रानों आजचा नवीन विषय आहे कालच्या मिड नाईट पोयम ची एक ओळ, कधी हरवली वाट... #कधी #हरवली #वाट #collab #yqtaai Best YQ Marathi Qu
"Rup"
बी.सोनवणे
वाट हरवली नाही रे दिसणार तुम्ही कधी, संपवले सर्वच काही जगण्याची नाही उमेदी...! ©बी.सोनवणे वाट हरवली नाही रे दिसणार तुम्ही कधी संपवले सर्वच काही जगण्याची नाही उमेदी #alone
अल्पेश सोलकर
एक आशा आहे... गुंतून ठेवणारी नशा आहे... मनी होकारी आकांशा आहे.. हाती आलेली निराशा आहे... एक आशा आहे.....! एक आशा आहे... गुंतून ठेवणारी नशा आहे... मनी होकारी आकांशा आहे.. हाती आलेली निराशा आहे... एक आशा आहे.....!