Nojoto: Largest Storytelling Platform

New अर्ध्यावरती डाव मोडला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अर्ध्यावरती डाव मोडला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अर्ध्यावरती डाव मोडला.

    PopularLatestVideo

Vrishali G

mute video

प्रल्हाद दुधाळ

#डाव

read more
डाव ..........

नियतीने दिलेले पत्ते
स्वीकारून डाव खेळावा!
डोकावून कधी कुठेही
कशाला जीव हा जाळावा?

खेळताना पत्त्याचा डाव 
राखावा हुकमाचा एक्का..! 
राणी असो किंवा गुलाम 
विजय आपलाच पक्का..! #डाव

Avinash lad

डाव..

read more
डाव..
===================
मंतरलेल्या रात्री
   डाव माझा असावा
        उधानल्या मनाचा
          हळवा स्पर्श व्हावा

बाहुपाशात तुझ्या
  जीव माझा असावा
       अन् चंद्र ताऱ्यांचा
         मेळ नभी दिसावा

बिलगून तुझ्यात
    श्वास गुंतत जावा
      शरारती दोघांच्या
        अंगी रोम हसावा

शब्दात खेळतांना
  ओठ तुझा भिडावा
       छेडून भावनांना
       उष्म श्वास गुंतावा

मंतरल्या रात्रीस
     अंगी रंग चढावा
      शीतल चांदण्यांत
       हात तुझा मिळावा

स्वप्न रंग भरती
   डाव मनी असावा
        पहाट वारा येता
        सूर्यप्रकाश व्हावा
====================
श्री.अविनाश लाड,राजापूर-हसोळ डाव..

Rajendrakumar Jagannath Bhosale

डाव #ViratKohli

read more
बोगस आदेशाची बेगडी कळ
बांडगूळ संघटना देण्या बळ

 भ्रष्ट मीडियाचे वापरून दळ
पैश्यासाठीच रचला हा तळ

व्यवस्थेचा हा साठलेला मळ
अर्धवटं तुकड्या साठी पळ
 
बहुजनां पाठी उमटला वळ
प्रगतीचा बंद करतात हे नळ

©rajendrkumar bhosale डाव

#ViratKohli

Vrishali G

डाव..😊

read more
mute video

Nitesh Gomane

एक प्रेमाचा असा डाव #Pehlealfaaz

read more
#Pehlealfaaz तुझ्या जाण्याने काहीच कमी नाही पडलं,
पण अर्ध आयुष्य संपल्या सारख वाटलं....।।

मनात आठवणींचं धुकं मात्र दाटल,
नकळत माझं हृदय मात्र फाटलं.....।।

अर्धवट प्रेम सोडून तुला बरं वाटलं,
हे सारं करून तुला काय भेटलं......।।
                    तुला काय भेटलं.....
  
             ✍कोंकण कवी:-नितेश गोमाणे एक प्रेमाचा असा डाव

Mayuri ghag

 #sweetness_thinking #life #मांडलेलाडाव #डाव

Sumit Gadekar

पुन्हा मांडू ये डाव पटावर...

read more
mute video

kishor

आपलाच डाव...! #nojota #Quote #marathiquote #lifequote #marathiwriter

read more
सारखं सारखं लिहायचं काहीतरी 
आणि पुन्हा पुन्हा पुसून टाकायचं 
हा कसला खेळ, ही कसली रीत 
 आपलाच प्यादा,
आपलेच नियम,
आपलाच डाव,
तो आपणच मोडायचा आपलाच डाव...!
#nojota #quote #marathiquote #lifequote #marathiwriter

Shankar Kamble

सारीपाट आयुष्याचा
              डाव रोजचेच नवे
फासे फेकतो आशेचे
             दान मनोचीत हवे..

ओढ मधल्या मधली
              होरपळ सोंगटीची
गुढ अंधार गुपीत
              भ्रांत असते उद्याची..

बोटावर नाचवितो
             कधी पाडतो,ताडतो
दुवे निखळले तरी
             तोच नव्याने जोडतो..

घेरलेले चहुबाजी
            शर भेदती देहाला
ढाल करुनी हिम्मत
            देई आव्हान मृत्यूला..

शह ,मात ठरलेली
            बाजी यावीन अपुरी
लढ वेढ्या प्राणपणे
            रीत जगण्याची खरी..

ठाम निर्धार मनाचा
             बळ पेरतो मातीत
तरारले किती तृण
             नाव कोरून छातीत..

©Shankar Kamble #Saffron #डाव #खेळ #जीवन #डावात #खेळहामांडला #बाजी #युद्ध
loader
Home
Explore
Events
Notification
Profile