Nojoto: Largest Storytelling Platform

New गजल मराठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गजल मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.

    PopularLatestVideo

Rajendrakumar Jagannath Bhosale

गजल (मराठी) #yogaday #मराठीशायरी

read more
गजल(मराठी)
गीत पाऊसाचे ओठी उमटले
अंगावरी  गुलाबी काटे शहारले ll धृ ll

बागेतील फुले रुसली जरी इथे
सुगंधित वारा चौफेर पसरलेll १ll

स्वप्ने झडून गेली शिशिरात
तरीही फांद्यावरी फुलोरा मोहरलेll २ll

आपलेच लोक आता झालेत परके
कितीं शहाण्यानी अश्रू पाझरले ll ३ll

सरी मध्ये झाडे सोसतात अबोली
 ढगांचा जिव्हाळा अवनीस भिजवले ll ४ll

कवी व गायक श्री राजेंद्रकुमार जगन्नाथ भोसले
मो. क्र.९३२५५८४८४५

©Rajendrakumar Jagannath Bhosale गजल (मराठी)

#yogaday

Deep Bawara

दुःखाचे डोळ्याशी करार झाले
                      अश्रू वाहुनी नयन बेजार झाले

                     कोंब फुटले मुक्या भावनाना 
                     बोल तुझे जेव्हां आधार झाले

                        खोल जख्मा तू दिल्या काळजाला
                     अबोल शस्त्र नजरेचे वार झाले

                    फुंकर मारुनी केलास घात तू
                        गोड्या पाण्याचे आता क्षार झाले

                      काळरात्री त्या बुडली माझी होडी
                        विझला "दीप"जीवन अंधार झाले

©Deep bawara #गजल #मराठीगजल #मराठी 

#NationalSimplicityDay

Shankar Kamble

जळणाऱ्या त्या चितेकडे उगां एकटक पाहत बसलो
आत पेटला जाळ तरी राख उद्याची वाहत बसलो

दबा धरून बसलेल्या श्वानांच्या झुंडी जागोजागी
लचके तोडून कशा हसती पाठ शांतीचा सांगत बसलो

जात माझी तोलतो "तो "पारड्यात ठेवून माणुसकीला
माप भरण्या माणुसकीचे मीच मला मग कापत बसलो

पोतलेला रंग निखळतो खपली उडते पुन्हा पुन्हा
पाया खचला तुझाच वेड्या दोष घराला देतं बसलो

विरक्तीचे हे भस्म लिंपूनी सोहळा झाला देखणासा
पोळे पाहून मधुर घटाचे एकाक्षाने सेवत बसलो

डोळ्यांच्या खाचा झाल्या मन पाझर पाझर आटले
खणतोय पुन्हां तळ आता बळ उसने मागत बसलो

चूल आहे विझली माझी काळोख दाटला भवती
चिमण्यांची फडफड नुसती सूर्यास ऐकवीत बसलो

पायांना माहित कुठले? वाटेचे बंड अघोरी
धुडकावून रुळल्या वाटा पथ नवीन शोधत बसलो

©Shankar Kamble #DiyaSalaai #चिता #मरण #जन्म #राख #गजल #मराठी #MarathiKavita

Shankar Kamble

गझल...

जाणत्या नेणत्या पणाचे हिशोब सारे राहून गेले
बंद मुठीतून ओघळणारे क्षण अत्तरी वाहून गेले

गुदमरलेल्या श्वासांनाही उसने थोडे श्वास मिळाले
डोकावून मग झरोक्यातूनी उनं बोचरे पाहून गेले

जगण्यासाठी धडपड करते धडावेगळे शीर अजूनी
नाळ गुंतली पाझर ओला किती उन्हाळे नाहून गेले

गर्द हिरवी झुकलेली नाजूक डहाळी आंब्याची
नवलाईचा मोहर गळता रूपं दर्पणी दावून गेले

रुळलेली ती वाट आजही रोज चालतो निगुतीने
शोध नव्या वाटांचा घेता वाटं पुरती लावून गेले

शांतीचा मी पाईक आहे साक्ष देतो वधस्तंभ हा
खबरदार जर खरे बोलशील जल्लाद सारे धावून गेले

कशांस नुसती उठाठेव ही? सूर्य अस्तास कधीच गेला
एक खुळी पण आस पेरली गीत पहाटे गावून गेले

©Shankar Kamble #Childhood #गजल #मराठीप्रेम #मराठीकविता #सुख #जीवन #जगणे #दूर #दुरावा

yogesh atmaram ambawale

खास आपल्या मैत्री साठी..एक छोटासा लेख..✍️ @manishadongrekulkarni #manishadongrekulkarni ओळख आमची दोन/तीन वर्षाची,ती पण समोरासमोरची भेट नव्हे #friendsforever #yqtaai #yqfriends #मैत्रीण #मैत्रीचेनाते

read more
मैत्री आमची...
( कॅप्शन मधील वाचावे ) खास आपल्या मैत्री साठी..एक छोटासा लेख..✍️
@manishadongrekulkarni #manishadongrekulkarni
ओळख आमची दोन/तीन वर्षाची,ती पण समोरासमोरची भेट नव्हे

HANAMANT YADAV (कवीराज)

मराठी गजल... स्वाभिमान राखला आहे...

read more
mute video

अमोल पाटील

#मराठी कविता #मराठी साहित्य #मी मराठी #माय मराठी #असेच मराठी #जीवन मराठी #nojotophoto

read more
 #मराठी कविता
#मराठी साहित्य
#मी मराठी
#माय मराठी
#असेच मराठी
#जीवन मराठी

अमोल पाटील

#मराठी कविता #मराठी साहित्य #वाचन #मराठी संस्कृती #मराठी कवी #मी मराठी #कविता #पल्लवी #poem #माय #हृदयात

read more
मी माझ्याच मुलखात 
नांदतो ऐश्वर्याचा राजा ,
इथे फुलवल्या ऐश्वर्याच्या बागा
इथले रानोमाळ सगणगंन
 पसरत हिरवी द्वाही
आणि 
"मी" पण म्हणत कितीक बुडाले 
इथल्याच जमिनीत ही #मराठी कविता 
#मराठी साहित्य 
#वाचन 
#मराठी संस्कृती 
#मराठी कवी 
#मी मराठी
#कविता
#पल्लवी

pandurang kokare

बोलतो मराठी ऐकतो मराठी...

read more
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... बोलतो मराठी ऐकतो मराठी...

GULAM MOHMAD

गजल गजल Turns5 #शायरी #NojotoTurns5

read more
बीते पल वापस ला नहीं सकते, सूखे फूल वापस खिला नहीं सकते, कभी कभी लगता है आप हमें भूल गए, पर दिल कहता है कि आप हमें भुला नही सकते.  💔 😢

©GULAM MOHMAD गजल गजल

#NojotoTurns5
loader
Home
Explore
Events
Notification
Profile