Nojoto: Largest Storytelling Platform

New लढा देणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लढा देणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लढा देणे.

Related Stories

    PopularLatestVideo

Shankar Kamble

मीच माझ्या वांझ मनाशी एक करार केला आहे
श्वासापुरते जगणे केवळ लयास माणूस गेला आहे...

नकोच उसन्या सुखदुःखाची रंगीत झालर चमचमणारी
श्रावण सरता वैशाखाची दाह,होरपळ धूसमुसणारी...

रोज पाहतो त्याच राऊळी तीच प्रभावळ तो वनमाळी
लोभ, वासना दंभपणाची भणंग घेऊन फिरतो झोळी...

कांगोऱ्यांनी सजले –नटले खुले अंगण निळ्या नभाचे
बिंब उमटता रक्त वर्णी ते कोश लोपले गर्द ढगाचे...

उगाच वाटे डोळ्यामधला पाझर आता आटून गेला
किती पेरले कोंब तरीही तळ मनाचा सुकून गेला...

एकच जीवन एकच जगणे एक धून पण कैक तराने
रंगमंच हा युगा युगांचा पडदा पडता येणे– जाणे...

©Shankar Kamble #माणूस #माणूसम्हणूनजगताना #जीवन #लढा #जगणं #अस्तित्व #प्रेम #चिंतन

Shankar Kamble

आवेशाच्या ललकारीने काताळाला कंप सुटावा
युगा–युगांच्या हुंदक्यातला विटाळ आता तरी फिटावा...

साथ–सोबत नको कुणाची नकोच उसने बळ आता
पिचलेल्या मनगटांत फिरुनी बंड पेरूया जाता जाता...

क्षणा–क्षणाला उसळत राही तप्त लाव्हां छातीमधला
पुन्हा चेतवू जुने निखारे रात्र काजळी तुम्हीच बदला...

शिंग तुतारी नौबत झडली नाद टापे गगनी भरली
लख्ख तळपत्या समशेरींना चेव, विरश्री अंगी स्फुरली...

तृणापरी पायात चिरडू यश किर्तीची शिखरे घडवू
मळभ सारुनी लाचारीचे स्वाभिमाने कोंदण जडवू...

©Shankar Kamble #Grayscale #लढा #युद्ध #अस्तित्व #लढाई #माणूस #संघर्ष #तलवार #टक्कर

Shankar Kamble

गझल...

जाणत्या नेणत्या पणाचे हिशोब सारे राहून गेले
बंद मुठीतून ओघळणारे क्षण अत्तरी वाहून गेले

गुदमरलेल्या श्वासांनाही उसने थोडे श्वास मिळाले
डोकावून मग झरोक्यातूनी उनं बोचरे पाहून गेले

जगण्यासाठी धडपड करते धडावेगळे शीर अजूनी
नाळ गुंतली पाझर ओला किती उन्हाळे नाहून गेले

गर्द हिरवी झुकलेली नाजूक डहाळी आंब्याची
नवलाईचा मोहर गळता रूपं दर्पणी दावून गेले

रुळलेली ती वाट आजही रोज चालतो निगुतीने
शोध नव्या वाटांचा घेता वाटं पुरती लावून गेले

शांतीचा मी पाईक आहे साक्ष देतो वधस्तंभ हा
खबरदार जर खरे बोलशील जल्लाद सारे धावून गेले

कशांस नुसती उठाठेव ही? सूर्य अस्तास कधीच गेला
एक खुळी पण आस पेरली गीत पहाटे गावून गेले

©Shankar Kamble #MerryChristmas #गझल #मराठीप्रेम #जीवन #सुख #झुंज #लढा #कोणी #सत्य

Shankar Kamble

जरासे....
क्षणभंगुर हे श्वास लाभले शाश्वत जगणे करू जरासे
आडोशाला पळभर थांबून निसटले ते स्मरू जरासे..

अभेद्य आणि भरभक्कम कर तटबंदी तू पुन्हा मनाची
घात घालूनी टपले वादळ पिसाट होवून भरू जरासे..

कोळून प्यालो आज हलाहल घोट रिचवले तसेच ओठी
चिरडलेल्या तृण पात्याचे भाले करुनी मरू जरासे..

सैरावैरा धावत सुटले निमिष एक ना कुठे थांबले
अकलेच्या या व्यर्थ वल्गना घासून ठिणगी पुरू जरासे..

शिडावीना ही नाव भरकटे खेळ हवाली तुझ्याच लाटे
पोहीन म्हणतो पाठ प्रवाही बुडलो,तरलो उरु जरासे..

खूप मागणे खूप सांगणे टिचभर झोळी गगन झाकणे
एक आरोळी रान पेटवू निशाण रोवून ठरू जरासे..

©Shankar Kamble #titliyan #श्र्वास #जीवन #जीवनअनुभव #लढा #युद्ध#संग्राम #जीवनगाणे #लढायचं

Shankar Kamble

हुंदक्यात आयुष्याचे गाणे सजले होते
सर नव्हती पावसाची आभाळ भिजले होते..

भणंग जिंदगीची वणवण कशास सोसू?
खंजीर खुपसले पाठी कट मागे शिजले होते..

खोल गेले पोट त्यांचे, त्यांचा झालासे नगारा
ते शांत साखर झोपी कुणी तसेच निजले होते..

फुंकतेस कशाला?चुल आहे पेटलेली
नजरेत भूक जळते अंगार विझले होते..

शाप दे वा वर दे सोय तुझी तू पाहून
तुजं कैद मंदिरी केले मी मनांत पुजले होते..

गाढलेला उकरून पुन्हां देह बाहेर काढला
सापडेना माणूस कुठे माणूसपण कुजले होते..

डोके गहाण ठेवून विकतो मलाच आता
बोली लावण्यास कैक दलाल जमले होते..

फोडून खापर माझ्यावर जो तो धन्य होतो
मूढ मती मी उशीरा गमते काय चुकले होते..

©Shankar Kamble #Light #जिंदगी #जीवन #जीवनअनुभव #जगणे #माणूस #लढा #माणूसम्हणूनजगताना #फासा #गूढ

Supriya Yewale

#HappyMusic मला इतकंच कळतं लोकांकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्या कामाकडे लक्ष देणे हे खूप महत्त्वाचे आहे #मराठीविचार

read more

Prerana Jalgaonkar

कॉलेजचं काम संपवून कॉलेजमधून निघाले.कॉलेजच्या गेटमधून बाहेर पडले तर एक बस यु-टर्न घेत होती.मी अगदी गेटसमोर थांबले.माझ्या डावीकडून एक उर्मट ट

read more
(लेख👇)
"साठ वर्षांपुढे माणसानं जगू नये,मरून जावं " कॉलेजचं काम संपवून कॉलेजमधून निघाले.कॉलेजच्या गेटमधून बाहेर पडले तर एक बस यु-टर्न घेत होती.मी अगदी गेटसमोर थांबले.माझ्या डावीकडून एक उर्मट ट

Prerana Jalgaonkar

कॉलेजचं काम संपवून कॉलेजमधून निघाले.कॉलेजच्या गेटमधून बाहेर पडले तर एक बस यु-टर्न घेत होती.मी अगदी गेटसमोर थांबले.माझ्या डावीकडून एक उर्मट ट

read more
(लेख👇)
"साठ वर्षांपुढे माणसानं जगू नये,मरून जावं " कॉलेजचं काम संपवून कॉलेजमधून निघाले.कॉलेजच्या गेटमधून बाहेर पडले तर एक बस यु-टर्न घेत होती.मी अगदी गेटसमोर थांबले.माझ्या डावीकडून एक उर्मट ट

haribhau gaikwad

👉परिस्थिती ही ताकद म्हणून लढा✅ | #nitinbagudepatil #anmolthought #Motivational #शिक्षण

read more

Sangeeta Kalbhor

#holihai खंत ना मजला आता जराही मी जीवनगाणे गातो आहे वसंत असो नसो सोबतीला मी कलेकलेने बहरतो आहे माझाच सहवास मला लाभता मी माझ्यातचं रमतो आहे न #शायरी

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile