Nojoto: Largest Storytelling Platform

New गझलेची बाराखडी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गझलेची बाराखडी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गझलेची बाराखडी.

Stories related to गझलेची बाराखडी

    LatestPopularVideo

vishnu thore

चांदणे शब्दातले उजळे सहज ज्यांचे स्मरण आग ह्रदयातील शब्दा पोळते ज्यांचे स्मरण.. अमरावतीतील कर्‍हाडे ब्राह्मणांचं एक सुखवस्तू घराणं

read more
 चांदणे शब्दातले उजळे सहज ज्यांचे स्मरण 
आग ह्रदयातील शब्दा पोळते ज्यांचे स्मरण..

        अमरावतीतील कर्‍हाडे ब्राह्मणांचं एक सुखवस्तू घराणं

swati ravindra jagtap

मराठी बाराखडी in English

read more

Shankar Kamble

*न केलेल्या गुन्ह्याची रोज शिक्षा भोगतो मी* 
 *देवून श्वास उसने मरणांस रोखतो मी* 

*सांगून गूज कानी अंधार पेटलेला*
*चेतवू नको स्मशाने राखेत शोधतो मी*

*डोळ्यांत दाटलेल्या सरी कैक शांत गहिऱ्या*
*बरसू नको अवेळी वळीवास सांगतो मी*

*संवाद साधण्याला प्रतिसाद सादास द्यावा*
*भाषा अबोल आहे मौनास जाणतो मी*

*मातीत पेरलेल्या अंकुरास धाप लागे*
*तोडून नाळ ओली प्राणास शिंपतो मी*

*पानांस गर्द हिरवा माखून साज रंग*
*भाळी उदास रेषा कुंकास रेखतो मी*

*लपेटून नशिबाच्या लक्तरात आयुष्याला*
*दोष कोणता ?कुणाचा? कोड्यात गुंततो मी*

*जपले उरांत त्यांनी कवटाळूनी घराला*
*केल्या उभ्याच भिंती दगडांस भांडतो मी*

©Shankar Kamble #Travel #गझल #गझलेची #जीवन #माणूस #जीवन #अनुभव #धोका

Shankar Kamble

....गझल....
सुकलेल्या पात्यास सांगा पावसाळे सरून गेले
कशास झुरणे आता अवेळी बेट ढगांचे दुरून गेले

सप्तरंगी इंद्रधनुला नजर लागली कशी कुणाची
गंध उडावा जसा अत्तरी रंग जीवनी विरून गेले

उमटलेल्या पायखुणांचा मागमूस ना आता उरावा
रिती करावी ओंजळ वाटे डोह मनाचे भरून गेले

चोरपावली सांज दाटते गडद गहिरी तरुतळी
भावनांचे रम्य पिसारे अलवार एकदा फिरून गेले

पुसू कुणाला प्रश्न किती ते उत्तरावीन जरी तिष्ठले
गूज मनींचे मनांस ठाऊक नजरेने ते कळून गेले

आणाभाका मधु प्रीतीच्या वचनांची ती पुन्हा उजळणी
शिंपले आता अमृत जरीही कोंब कोवळे मरून गेले

©Shankar Kamble #प्रेमकवि #विरह #गझल #मराठीशायरी #कवी #प्रेम #गझलेची 

#diary

Shankar Kamble

विरहात चांदण्यांच्या गोंदणात दिसतेस तू
नाही म्हणू कशास दर्पणी त्या हसतेस तू

नांदलीस झोपडीत या हाव ना महालाची
महाल ही मग भग्न भासतो जेंव्हा नसतेस तू

सावलीच माझी झाली अंधार झेला यला हा
सांगितले मी उन्हाला त्यालाही पुरतेस तू

रांधलेस किती कष्ट झिजली अशी दिन राती
गंध केवडा हिरमुसला जेंव्हा खुलतेस तू

रापले हे हात तुझे माझ्या कमनशिबी झळाने
अंकुर पुन्हा नव्याने सूर्यात पेरलेस तू

©Shankar Kamble #गझल #गझले #गझलेची #तू #तू_आणि_मी #प्रेम #प्रेम #प्रेमकवि 

#FindingOneself

gaurav

सूचना : बाराखडी कविता वाचायला सोपी जावी म्हणून आपली कविता आपल्या नावा सहित कॅप्शन मधे कॉपी-पेस्ट करावी. #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_य मरा #Collab #YourQuoteAndMine #yqkavyanand #sateeshranade #मराठीकोट्स

read more
येणाऱ्या पावसाचा थेंब जसा पाहुना होऊनी आला..
 सप्तसागरांच्या वाऱ्यांना उधान देणारा...
चमकेरी प्रकाशात जसा न्हाऊन निघाला दिसतो अनोखा..
मोती येतायेत जसे भेट घेऊनी काळ्या आईला..
किंमत तुझी खुप मोठी कसा काय जातोंस शिंपल्यांच्या तळाला..
मोती तयार करतों तुझ्यात , तुला मोती म्हणावं वाटत जसे.
निसर्गाचा प्रसाद जसा तु मला शिंपले गवसले...
कधी फजिती करतो कधी हर्षांत बुडलेला...
  कधी ठरतोस जीवनाचा जीवनदाता..
शिंतोडे जसे तुषार फेकलेले माझ्या अंगावर रोमहर्ष झाले..
तुझ्या थेंबानी जसे आसमानात तोरण ओवले..
कधी पुष्प होऊनी पडतो धार्मिकतेचा कल जसा...
 जीवंतपणाची आठवण देतो जपण्यास श्रद्धा..
आसमानाचा वेगवान खुप तु कधी घरंगळणारा मनाच्या खोल्यांत पाझरलेला..
तुझ्या रूपांत शब्दांनी तुला लेखक सजवणारा...
ठिपकणारा वृक्षांच्या पानावरला बिंदव तु पावसाचा..
 प्रेम लपलेले तुझ्यात त्या हिरव्या मिलनाचा..
शांततेत कधी स्वतः रमणारा मृदु बोलांचा जसा लेकुरलवाळा..
ओठी साचलेल्या लालीचा वाटेदार तु जसा...
झिरपणाऱ्या डोंगरावरच तिकडेच रममान तोऱ्यांत तुझ्या..
सुचलेल्या ओळी तुझ्या स्वागताच्या वलसर झालेल्या.. सूचना :
बाराखडी कविता वाचायला सोपी जावी म्हणून आपली कविता आपल्या नावा सहित कॅप्शन मधे कॉपी-पेस्ट करावी.
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_य
#मरा

yogesh atmaram ambawale

सूचना : बाराखडी कविता वाचायला सोपी जावी म्हणून आपली कविता आपल्या नावा सहित कॅप्शन मधे कॉपी-पेस्ट करावी. #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_य मरा #Collab #YourQuoteAndMine #yqkavyanand #sateeshranade #मराठीकोट्स

read more
येतात कित्येक जण आयुष्यात,
कित्येक जण आयुष्यातून निघून जातात.
आठवणीत मात्र तेच राहतात,
जे हृदयात वसलेले असतात.

अनोळखी चेहरे कधी कधी,
खूप जुनी ओळख असल्यासारखे भासतात.
 तर ओळखीचे चेहरे कित्येक,
 अनोळखी असल्यासारखे वाटतात.
 
प्रेम असते मनात आपुलकीचे भावना असते,
म्हणून ओळख नसतानाही आपलेसे वाटते.
सोबत सतत त्यांची हवीहवीशी वाटते,
जे आपल्या हृदयात घर करून बसलेले असते. सूचना :
बाराखडी कविता वाचायला सोपी जावी म्हणून आपली कविता आपल्या नावा सहित कॅप्शन मधे कॉपी-पेस्ट करावी.
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_य
#मरा

yogesh atmaram ambawale

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट आजचे_अ #Collab #YourQuoteAndMine #yqkavyanand #मराठीकोट्स #आजचे_अक्षर_ब

read more
"ब" अक्षर आले आज,
बाराखडी व्यंजनकोट मध्ये.
सकाळपासून विचार करतोय,
पण काही येत नाही डोक्यामध्ये.
बऱ्याच जणांचे लिहून झाले,
मी मात्र अजून विचारात आहे.
एक विषय सुचला की,
लिहित असताना दुसरा विषय सुचत आहे.
छान छान लिहिले आज सर्वांनी,
प्रत्येकाने वेगवेगळे विषय हातातले आहे.
शिल्लक असा काही विषयच नाही राहिला,
म्हणून मी असा हा वेगळा प्रयत्न केला आहे. २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अ

yogesh atmaram ambawale

सूचना : बाराखडी कविता वाचायला सोपी जावी म्हणून आपली कविता आपल्या नावा सहित कॅप्शन मधे कॉपी-पेस्ट करावी. #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_य मरा #Collab #YourQuoteAndMine #yqkavyanand #sateeshranade #मराठीकोट्स

read more
योगेश माझे नाव
अन् भिवंडी माझे गाव.
लिहिण्याची आवड लहानपणापासून
म्हणून वाय क्यु वापरतो राव.

कवितेतील प्रकार,न मला नीट ठावं
उतरवितो कागदावर,मनातील मी भाव.
छान सहाय्य करतात,समजावतात जे हवं
समजून घेतात इथे सारे,ठेवत नाही नावं.

खूप छान लिहितात इथे सारे
प्रत्येकाच्या अंगात भिनलेय कवितेचे वारे.
मोठे लेख कुणाचे,कुणाची चारोळी असते
काहीही असो वाचायला खुप छान वाटते. सूचना :
बाराखडी कविता वाचायला सोपी जावी म्हणून आपली कविता आपल्या नावा सहित कॅप्शन मधे कॉपी-पेस्ट करावी.
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_य
#मरा

Ayesha Ansari

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों तुम्ही सुद्धा चकीत असाल ना अरे ताई नी काय दिलयं आज नुसतेच हे?? क हा आपल्या बाराखडी मधला एक महत्वाचा घटक आहेे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कोऱ्या  पानात जीवनाचे 
कृष्णकमळापेक्षे जास्त सुंदर रीतीने 
कष्ट माझे भविष्य  लिहिणार
 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
तुम्ही सुद्धा चकीत असाल ना अरे ताई नी काय दिलयं आज नुसतेच हे??
क हा आपल्या बाराखडी मधला एक महत्वाचा घटक आहेे.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile