Nojoto: Largest Storytelling Platform

New marathi gazal Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about marathi gazal from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, marathi gazal.

    LatestPopularVideo

SATYAJIT ANANDRAO JADHAV

आयुष्यभर सोबत असून ... प्रा . सत्यजीत जाधव . #marathi #gazal #MarathiKavita #marathishayari

read more

सागर चव्हाण

कविता 

फुलासारखी हातात धरून पहावी कविता
कधी व्हावे कवी अनं,करून पहावी कविता

रोजच येते ते छतावर करूनी केसं मोकळे 
रोजच मग जराशी,चोरून पहावी कविता

शब्दा शब्दा मध्ये तर श्वास असतो तिच्या
पण त्या आधी जराशी,मरून पहावी कविता
  
कळतच नाहीत तिला,रंग,धर्म,जात,पंथ
सुचते का मग माणसा वरून पहावी कविता

-सागर झामसिंग चव्हाण
मो.7499809511 #Flower #gazal #marathi #kavita

sonali Kulkarni

इतकेच मला जाताना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते.

ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही
मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते.

गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरू या
पाऊल कधी वाऱ्याचे माघारी वळले होते.

मी ऐकवली तेव्हाही तुज माझी हीच कहाणी
मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते

नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली
नुसतेच तुझे हृदयाशी मी भास कवळले होते.

याचेच रडू आले की जमले न मला रडणेही
मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रूंत मिसळले होते.

घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली
जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते

मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो
मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते.

गझलकार सुरेश भट #footsteps 
#sureshbhat  #gazal #marathi #MarathiKavita

मारुती माने

mm poem shayari gazal marathi

read more
मागण्या आधी दिले तुला सारे
हे हवे आहे म्हणू दिले नाही

प्रेम केले जन्मभर जिच्यावर मी
ते तिला सुद्धा कळू दिले नाही

        ~मारुती माने #mm #poem #shayari #gazal #marathi

Tushar SS Ghardekar

ती रंग लावण्याचा, जरा हट्ट करत आहे 
माझ्यात गुंतन्याचा, मौका, जबरदस्त बघत आहे

होळी फुलांची माझ्या, बागेत रोज असते
तिचा गुलाब मजला मनसोक्त बघत आहे

ती राधा कधी जर झाली, मी श्याम कधीही होईल
एवढ्याच प्रसंगाकरिता, वृंदावन, वाट बघत आहे

ओठांत अन् त्या डोळ्यात संवाद रोज असतो
योजना आखण्याची, नुसती वेळ बघत आहे 

या कलेच्या स्वर्गात, तिचे नृत्य कसे ही असूद्या
प्रेमात आज माझा, ती किरदार बघत आहे

©Tushar SS Ghardekar #मराठीकविता #गझल #प्रेम #Love #Prem #gazal #marathi 

#Holi

Snehal

झिजुन गुलाबाचे काटे गेले कधी हे कळलेच नाही
आधार वाढत्या वेलीस कसा मिळाला हे दिसलेच नाही..

गर्जनेचा नभांच्या,हा रोष कधी जाणलाच नाही
अंधारात प्रकाश विजेचा मज कधी भावलाच नाही..
 
किलबिलाट म्हणु का वेदना संबोधु कधी उलगडलेच नाही
सप्तसुरांचा हा मेळ म्हणू का कल्लोळ कधी उमगलेच नाही..

सुर्याच्या ज्वालेस शितलता चंद्राची कधी मिळालीच नाही
मृगजळ दाखवण्याचा वाटसरूस हा डाव कधी काळजास भिडलाच नाही..

आस्तित्वाचा तुझ्या स्पर्श या देहास कधी लाभलाच नाही 
अन              अखंड श्रद्धेचा हा भार कधी घटलाच नाही.. #Gazal
#marathigazal
#poetry
#marathi
#nojotomarathi
#kavita
#marathilove
#mothertounge

Tushar SS Ghardekar

गझल

का इतके प्रेम तुझ्या वर आले ठाऊक नाही 
मी तुझ्यात गुंतल्यापासून, मी मला ठाऊक नाही 

उगाच होतो गर्द हा सूर्य जाण्याआधी
सकाळ प्रेमळ होते, का ते? ठाऊक नाही

मोकळ्या तुझ्या केसांमध्ये तो गजरा शोभतो
मग गुलाब हसतो की रुसतो? ठाऊक नाही

अन् ह्या स्वर्गात अप्सरा आहे म्हणते ऐकले मी
तू समोर आहे माझ्या, ती कोण? ठाऊक नाही

ही मेहफिल संपल्यानंतर प्रतिसाद भेटतो
ती कोण आहे म्हणते, मी म्हणतो... ठाऊक नाही
- तुषार एसएस घरडेकर

©Tushar SS Ghardekar #OneSeason #Love #gazal #marathi #marathikavi #tusharghardekar #प्रेम #गझल

Sam B

............

©Sam B #gazalmarathi #gazal #marathi #MarathiKavita #marathiquotes  #gazals #गझल #मराठी #महाराष्ट्र #वेदना

ಮೌನ मौन

Marathi trend #marathi #शायरी

read more

Prerana Jalgaonkar

yqtaai marathi marathiwriter marathi

read more
साधारणतः ज्या विद्यार्थ्याला कमी मार्क मिळतात अशा विद्यार्थ्यावर "ढ" विद्यार्थ्याचा शिक्का मारला जातो."ढ" चा अर्थ कमी हुशार.परंतु कमी मार्क मिळण्याचे कारण वेगळं असू शकतं. विद्यार्थ्याला त्या विषयात रसच नसेल, त्याच्या आवडीचे शिक्षक नसतील किंवा मग त्याला अभ्यास करायचा नसेल.काही विद्यार्थी,समजलं नसेल तरीही समजल्याचा आव आणतात.तर काही समजून न समजल्यासारखं करतात.
आपलं मन आपल्याला रोज नवनवे प्रश्न विचारत असतं.आपण त्या प्रश्नांची उत्तरं शोधत राहतो, नकळत मनाची अस्वस्थता वाढत जाते.मन कासावीस होऊ लागतं.असं घडत असेल तर आपणही "ढ" बनायला काय हरकत आहे.इथे "ढ" म्हणजेच ढोंगी बनलं तर..? सर्व समजून न समजल्यासारखं करायचं. शांत रहायचं.निदान तसा प्रयत्न तरी करायचा..लहान मुलाला नाही का,एखादं खेळणं हवं असताना आई टोलवाटोलवी करते आणि दुसरं खेळणं किती चांगलं आहे असं पटवून देते.तसच काहीस....
--प्रेरणा  #yqtaai #marathi #marathiwriter #marathi
loader
Home
Explore
Events
Notification
Profile